पावसाच्या एंट्रीने शेतकऱ्यांना दिलासा, अधूनमधून जोरदार सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:14 PM2019-08-24T12:14:34+5:302019-08-24T12:19:45+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेले १० दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. विशेषत: माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

 Rain entry reassures farmers, occasionally heavy showers | पावसाच्या एंट्रीने शेतकऱ्यांना दिलासा, अधूनमधून जोरदार सरी

पावसाच्या एंट्रीने शेतकऱ्यांना दिलासा, अधूनमधून जोरदार सरी

Next
ठळक मुद्दे पावसाच्या एंट्रीने शेतकऱ्यांना दिलासा, अधूनमधून जोरदार सरीमाळरानावरील पिकांच्या तोंडात पाणी

कोल्हापूर : जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेले १० दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. विशेषत: माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार पावसाने लोकांना सळो की पळो करून सोडले होते. आता पाऊस नको नको म्हणत, पाऊस थांबविण्यासाठी देवाकडे साकडे घालण्याची वेळ आली होती. ११ आॅगस्टनंतर पाऊस हळूहळू कमी होत गेला; पण त्यानंतर एकदमच पावसाने दडी मारली. गेले १० दिवस खडखडीत ऊन पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.

माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. १० दिवसांपूर्वी अस्ताव्यस्त पसरलेल्या नद्या, ओढ्यांचे पाणी पात्रात जाऊन शांतपणे वाहू लागले आहे. नद्यांची पाणीपातळी एकदमच कमी झाली आहे. शिवारे कोरडी पडल्याने पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे.

गुरुवार, शुक्रवारपासून पावसाचे वातावरण तयार होत गेले आणि अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून मात्र वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणासह दिवसभरात जोरदार सरी कोसळल्या. पावसाने पुन्हा एंट्री केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गगनबावड्यात अतिवृष्टी

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८४.५९ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ७१ मिलिमीटर झाला आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा

हातकणंगले (०.६३), शाहूवाडी (१.६७), राधानगरी (२.००), गगनबावडा (७१.००), करवीर (१.३६), कागल (०.२९), गडहिंग्लज (२.४३), भुदरगड (१.८०), आजरा (२.२५), चंदगड (१.१७).
 

 

Web Title:  Rain entry reassures farmers, occasionally heavy showers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.