corona virus-रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:21 PM2020-03-18T18:21:02+5:302020-03-18T18:22:19+5:30

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांऐवजी तब्बल ५० रुपये करण्यात आले. फलाटवरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी तिकिटामध्ये तब्बल पाचपटीने वाढ करण्यात आली आहे.

Railway platform tickets from 1 rupees to 5 rupees | corona virus-रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपयांवर

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर बुधवारी दुपारी तुरळक प्रवासी असल्याने रेल्व स्थानकांवर शुकशुकाट होता. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देरेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपयांवर‘कोरोना’ची वाढती गर्दी टाळण्यासाठी दरात वाढ

कोल्हापूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांऐवजी तब्बल ५० रुपये करण्यात आले. फलाटवरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी तिकिटामध्ये तब्बल पाचपटीने वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारसोबतच राज्य प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून रेल्वे प्लॅटफॉर्मवरील तिकीट दरामध्ये वाढ केली आहे.

कोरोनाचा फैलाव होऊ नये, रेल्वे स्थानकांवर विनाकारण गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून या निर्णयांची अंमलबजावणीही कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे क रण्यात आली आहे. मोजके प्रवासी वगळता दिवसभर स्थानकांवर शुकशुकाट होता.

 

 

Web Title: Railway platform tickets from 1 rupees to 5 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.