कोल्हापूर-जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर आणि मौजे उमळवाड येथे तीन खासगी सावकारांची घरे आणि व्यवसायांवर जिल्हा उपनिबंधकांनी छापे टाकून कारवाई केली. गुरुवारी (दि. १३) दुपारी केलेल्या कारवाईत धनराज बाळासो भवरे, प्रशांत प्रमोद पोवळे (दोघे रा. जयसिंगपूर) यांच्या राहत्या घरी आणि उमळवाड येथील विमल ज्वेलर्स या दुकानावर छापा टाकला.अमोल खुरपे व सीमा अमोल खुरपे (रा. जयसिंगपूर) यांच्या राहत्या घरी अवैध सावकारी कार्यवाही अंतर्गत घर झडतीतून सह्या केलेले कोरे धनादेश, व्याजाच्या नोंदीची कागदपत्रे, सोने तारण कागदपत्रे जप्त करण्यात आली.धनराज भवरे याच्या राहत्या घरातून सह्या केलेले ३३ कोरे धनादेश, तीन करारपत्रे, व्याज व्यवहाराच्या दोन नोंदवह्या, पाच वाहनांचे आरसी बुक, सोने तारण व्याजाच्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या मिळाल्या. प्रशांत पोवळे याच्या विमल ज्वेलर्समध्ये काही नोंदवह्या मिळाल्या. या नोंदवह्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्या. छाप्याची कारवाई सुरू होताच यातील एका खासगी सावकाराने एक कार कर्जदाराला परत केल्याची माहिती पथकातील अधिका-यांनी दिली.सहकार विभागाचे एक अधिकारी आणि १२ कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. तसेच आठ पोलिसही उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार ही कारवाई झाली.तक्रारी करण्याचे आवाहनजिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध खासगी सावकारी सुरू आहे. यातून कर्जदारांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
Web Summary : Raids on three private moneylenders in Kolhapur's Jaisingpur and Umalwad led to the seizure of blank checks, loan documents, and gold pledges. The action, initiated after rising complaints, was carried out by a team of cooperative department officials and police, prompted by directives from the District Collector and Superintendent of Police. Citizens are urged to report illegal lending activities.
Web Summary : कोल्हापुर के जयसिंगपुर और उमलवाड में तीन निजी साहूकारों पर छापे मारे गए, जिसमें खाली चेक, ऋण दस्तावेज और सोने के गिरवी जब्त किए गए। बढ़ती शिकायतों के बाद यह कार्रवाई की गई, जिसे सहकारी विभाग के अधिकारियों और पुलिस की एक टीम ने जिला कलेक्टर और पुलिस अधीक्षक के निर्देशों पर अंजाम दिया। नागरिकों से अवैध ऋण गतिविधियों की रिपोर्ट करने का आग्रह किया गया है।