बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST2020-12-05T05:02:03+5:302020-12-05T05:02:03+5:30
वीसजणांवर गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथे बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्या पाच ठिकाणी गावभाग व पोलीस उपअधीक्षक बाबूराव ...

बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यांवर छापे
वीसजणांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथे बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्या पाच ठिकाणी गावभाग व पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईत सुमारे चार लाख ९२ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वीसजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ३) रात्री करण्यात आली.
सुनीता सनी माछरे (वय ३०), बाप्पा मारुती देडे (३५), तानाजी शहाजी चव्हाण (२६, तिघे रा. साईट नं. १०२, सहकारनगर), महंमद मेहबूबखान पठाण (२३, रा. आसरानगर), विकास अनिल कुराडे (२४, रा. नेहरूनगर), शिवाजी यशवंत पोवार (४१, रा. सुतार मळा), भारत विजय राटवळ (२२, रा. लालनगर), प्रमोद महादेव जावीर (२१, रा. कारंडे मळा), विनायक सावता भिसे (३०, रा. कोल्हापूर नाका), प्रमोद बाळगोंडा पाटील (३४, रा. टाकवडे वेस), शुभम सोपान ऐवळे (२३, रा. कारंडे मळा), रफिक बादशहा सदलगे (३८), बसवराज शंकर आदिमनी (३०, दोघे रा. नेहरूनगर), नितीन नागाप्पा सुर्वे (३९), महेश विठ्ठल राखे (३२, दोघे रा. लाखेनगर), गणेश मारुती पाटोळे (२५, रा. कांबुरे गल्ली), तेजस कैलास मिणेकर (३०, रा. विक्रमनगर), फिरोज बाबासाहेब जमादार (२५), जुबेर नजीर सय्यद (२१, दोघे रा. सुतार मळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.