धामणेत दारू अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:20+5:302021-05-09T04:24:20+5:30
( फोटो स्वतंत्र ) उत्तूर. धामणे येथील शंकर दादू लोकरे हे घराच्या पाठीमागे बेकायदेशीर दारूची ...

धामणेत दारू अड्ड्यावर छापा
( फोटो स्वतंत्र )
उत्तूर. धामणे येथील शंकर दादू लोकरे हे घराच्या पाठीमागे बेकायदेशीर दारूची विक्री करीत असताना आजरा पोलिसांनी दारू अड्ड्यावर छापा टाकून सव्वा लाखाची देशी-विदेशी अशी दारू जप्त करून लोकरे याला अटक केली. याबाबत आजरा पोलिसांत संतोष कडाप्पा घस्ती (पोलीस नाईक, रा. आजरा. पोलीस ठाणे) यांनी दिली.
अधिक माहिती अशी, धामणे ते बेलेवाडी जाणारे रस्त्याचे बाजूला असणाऱ्या घराचे पाठीमागील घरात शंकर दादू लोकरे हा सर्व प्रकारची देशी-विदेशी दारू चोरी-चुपके विकत असल्याची माहिती खास खबऱ्यास मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास लोकरे हा दारू विकत असताना रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी वेगवेगळ्या नमुन्याची ४२ बॉक्स असलेला १ लाख १९ हजार ८३२ रुपयांचा माल जप्त केला.
पोलीस निरीक्षक बी. टी. भांगे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. कोचरगी, निरंजन जाधव, सचिन वायदंडे, आदींनी कारवाई केली.
धामणे (ता. आजरा) येथे शंकर लोकरे यांच्या घरी आजरा पोलिसांनी पकडलेली देशी - विदेशी बेकायदेशीर दारू.