Kolhapur: मीदेखील लोकसभेच्या रिंगणात, राहुल आवाडे यांनी स्पष्ट केली भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 01:23 PM2024-03-28T13:23:34+5:302024-03-28T13:26:41+5:30

भाजपला पाठिंबा दिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या चिरंजीवांनी ही भूमिका घेतल्यामुळे महायुतीमध्ये पेच वाढण्याची शक्यता

Rahul Awade will contest from Hatkanangle Lok Sabha constituency, There is a possibility of controversy in the Mahayuti | Kolhapur: मीदेखील लोकसभेच्या रिंगणात, राहुल आवाडे यांनी स्पष्ट केली भूमिका 

Kolhapur: मीदेखील लोकसभेच्या रिंगणात, राहुल आवाडे यांनी स्पष्ट केली भूमिका 

कोल्हापूर : महायुतीने हातकणंगलेलोकसभा मतदारसंघाबाबत आपल्याला विश्वासात घेतलेले नाही. आपली आधीपासून तयारी सुरू असल्यामुळे लोकसभेच्या निवडणूक रिंगणात मीही उतरणार असल्याची स्पष्ट भूमिका राहुल आवारे यांनी बुधवारी मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. 

आवाडे म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही उमेदवारीसाठी यंत्रणा सक्रिय केलेली होती. आता निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे काम थांबविणे अवघड आहे. महायुतीचा हातकणंगलेलोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविताना आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही, त्यामुळे ही निवडणूक लढविण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. 

शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी याबाबत अंतिम चर्चा होऊन माने यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे. अशातच भाजपला पाठिंबा दिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या चिरंजीवांनी ही भूमिका घेतल्यामुळे महायुतीमध्ये पेच वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Rahul Awade will contest from Hatkanangle Lok Sabha constituency, There is a possibility of controversy in the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.