वीरशैवच्या सभासदांच्या विश्वास पात्र राहू -अनिल सोलापुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 14:21 IST2021-01-30T14:19:22+5:302021-01-30T14:21:10+5:30

Banking Sector kolhapur- वीरशैव को. ऑप. बँकेच्या सभासदांनी टाकलेला विश्वासास पात्र राहू, असा विश्वास बँकेचे नूतन अध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी व्यक्त केला.

Rahu-Anil Solapure, trustworthy of Veershaiva members | वीरशैवच्या सभासदांच्या विश्वास पात्र राहू -अनिल सोलापुरे

 वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे व उपाध्यक्षा रंजना तवटे यांच्यासह संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील गाताडे, सुहास भेंडे आदी उपस्थित होते. 

ठळक मुद्देवीरशैवच्या सभासदांच्या विश्वास पात्र राहू -अनिल सोलापुरे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने नूतन संचालकांच्या सत्कार

कोल्हापूर : वीरशैव को. ऑप. बँकेच्या सभासदांनी टाकलेला विश्वासास पात्र राहू, असा विश्वास बँकेचे नूतन अध्यक्ष अनिल सोलापुरे यांनी व्यक्त केला.

वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने वीरशैव बँकेच्या नूतन संचालकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे होते. अध्यक्ष अनिल सोलापुरे म्हणाले, वीरशैव बँकेचे शेड्यूल्ड बँकेत रूपांतर होण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून लवकरच बँक हा टप्पाही पार करेल.

ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे, सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, राजेश पाटील- चंदूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुहास भेंडे यांनी प्रास्ताविक केले. राजू वाली यांनी सूत्रसंचालन केले. महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी कदम यांनी आभार मानले.
 

Web Title: Rahu-Anil Solapure, trustworthy of Veershaiva members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.