शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राधानगरी तालुक्यात जनावरांना होतेय 'लंपी ' रोगाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 2:23 PM

'Lampi' disease, amimal, health, doctor, kolhapurnews   'कोरोना'चा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा कमी झाला पण राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये जनावरांना लंपी (त्वचारोग) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे.  'कोरोना'चा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा कमी झाला पण राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये जनावरांना लंपी (त्वचारोग) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या पूर्ण अंगावर पुरळ येतात. जनावरांना मोठी खाज सुटते व तापही येतो. सात दिवसात त्याच्यावर उपाय न झाल्यास जनावर दगावण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पशुपालक मोठया चिंतेत सापडले आहेत.

ठळक मुद्देराधानगरी तालुक्यात जनावरांना होतेय 'लंपी ' रोगाची लागणविषाणूजन्य त्वचारोगाचे पहिले बाधीत जणावर अढळले धामोडमध्ये

श्रीकांत ऱ्हायकरधामोड  :  'कोरोना'चा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात थोडासा कमी झाला पण राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरामध्ये जनावरांना लंपी (त्वचारोग) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने तालुक्यातील दुध उत्पादकांमध्ये कमालीची भिती निर्माण झाली आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या पूर्ण अंगावर पुरळ येतात. जनावरांना मोठी खाज सुटते व तापही येतो. सात दिवसात त्याच्यावर उपाय न झाल्यास जनावर दगावण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पशुपालक मोठया चिंतेत सापडले आहेत.विदर्भ किंवा मराठवाडा या ठिकाणी तुरळक प्रमाणात 'लंपी 'या विषानूजन्य त्वचारोगाने बाधीत असणारी जनावरे सापडतात. पण तिथे लस उपलब्ध असल्याने या संसर्गजन्य आजाराचा फैलाव अटोक्यात आहे. पण गेल्या चार दिवसापासून धामोड परिसरात या संसर्गजन्य रोगाची जनावरे आढळू लागल्याने दुग्ध व्यावसाईकामध्ये भिती निर्माण झाली आहे. त्यात कोल्हापूर पशुवैद्यकीय विभागाकडे ही लस उपलब्ध नसल्याने व हा संसर्गजन्य रोग असल्याने पशुपालकांसह पशुवैद्यकीय विभागासमोर एक संकट उभे ठाकले आहे.बाधीत जनावराच्या पूर्ण अंगावर पुरळ उठणे, अशक्तपणा, ताप, अंगाला खाज सुटणे, दुधाळ जनावरांचे दुध पूर्णपणे बंद होणे अशी लक्षणे दिसतात व सात दिवसात  उपचार न झाल्यास ते जनावर दगावण्याची शक्यता असते. हा संसर्गजन्य आजार असल्याचे डॉक्टरांचे मत असल्याने गोठा प्रकल्पाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्यात प्रचंड भिती निर्माण झाली आहे.

धामोड (ता. राधानगरी ) येथील गणपती भामटेकर यांच्या गाईला या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे धामोड येथील पशुवैद्यकीय डॉ. अनिल शिंदे यांनी तत्काळ या गायीची पाहणी करून उपचार सुरू केले आहेत. राधानगरी तालुक्यात अशा आजाराचे अद्याप एकही जनावर सापडलेले नाही. तालुक्यात लंपी आजार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते आहे.

सलग सात दिवस बाधीत जनावरांवर उपचार केल्यावर आजार संपुष्टात येतो. मात्र हा विषाणूजन्य आजार असल्याने इतर जनावरांनाही त्याचा धोका होऊ शकतो. "- अनिल शिंदे, पशुधन पर्यवेक्षक, धामोड

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारkolhapurकोल्हापूरHealthआरोग्यdocterडॉक्टर