शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी धरण ‘ओव्हर फ्लो’

By admin | Updated: August 25, 2015 00:06 IST

सहा क्रमांकाच्या दरवाजातून विसर्ग सुरू

राधानगरी : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागाची तहान भागविणारे राधानगरी धरण पूर्ण भरले आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सहा नंबरच्या स्वयंचलित दरवाजातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूझाला. राधानगरी धरण ८.३६ टी.एम.सी क्षमतेचे आहे. गतवर्षी १ आॅगस्ट रोजी धरणाचे दरवाजे खुले झाले होते. मात्र, यावर्षी पावसाने ओढ दिल्यांने धरण भरण्यास आॅगस्ट अखेर उजाडला. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे वीजनिर्मिती ठप्प आहे. परिणामी ३0 ते ४0 लाख युनिट विजेला मुुकावे लागले आहे. आजपर्यंत येथे २३७७ मि.मी. पाऊस झाला आहे. धरणाची पाणीपातळी ३४७.३0 फूट झाली आहे. पाणीसाठा ८.३00 टी.एम.सी. आहे. ३४७.५0 फुटांवर पाणीपातळी गेल्यावर दरवाजे उघडतात. सायंकाळी साडेसहा वाजता यातील सहा नंबरचा एक दरवाजा उघडला. या धरणाशेजारीलच २५.४0 टी.एम.सी. क्षमता असणाऱ्या काळम्मवाडी येथील शाहू सागर जलाशयात सध्या १८.६९ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. येथे आतापर्यंत १५९९ मि. मी. पाऊस झाला आहे. जूनअखेर धरणात ७.३६ टी.एम.सी. पाणीसाठा होता. २१ आॅगस्टपासून काळम्मावाडीच्या लाभ क्षेत्रातील पाणीटंचाईमुळे ४०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला, तर वीजनिर्मितीसाठी दोन प्रकल्पांत १८०० क्युसेक विसर्ग सुरूआहे. तालुक्यातील तुळशी धरणात आज २.५७ टी.एम.सी. पाणी साठा आहे.