शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Radhanagari Dam: राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे डागडुजीसाठी खुले, ७० वर्षे पूर्ण होऊनदेखील दरवाजे सुस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 12:08 IST

ब्रिटिशकालीन सातही दरवाज्याच्या आतील बाजूच्या लोखंडी अँगलना गंज चढला असून, धरण सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित दरवाजाचे हे काम अत्यंत आवश्यक असल्याने हाती घेण्यात आले आहे.

गौरव सांगावकरराधानगरी : राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या राधानगरीधरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे ७० वर्षे पूर्ण होऊनदेखील आजही व्यवस्थित उघडझाप करतात. पण वर्षातील ६ ते ७ महिने हे दरवाजे पाण्यात असतात. त्यामुळे ब्रिटिशकालीन सातही दरवाज्याच्या आतील बाजूच्या लोखंडी अँगलना गंज चढला असून, धरण सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित दरवाजाचे हे काम अत्यंत आवश्यक असल्याने हाती घेण्यात आले आहे.दरवर्षी थोड्याफार प्रमाणात मार्च- एप्रिलमध्ये पाणी कमी झाल्यानंतर दरवाजांना ग्रीसिंग ऑइलिंग अशी किरकोळ रिपेअरी केली जाते. पण धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच सातही दरवाजे खोलण्यात आले आहेत. गेट लिफ्टिंग, क्लिनिंग नवीन रबर सील, अँगलला पेंटिंग कोट ही कामे युद्धपातळीवर चालू आहेत.कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. एप्रिलअखेर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी (राधानगरी धरण) प्रवीण पारकर, शाखा अभियंता समीर नीरूखे उपस्थित होते.सातगेटचे काम हातात घेतले असले तरी पूर नियंत्रणासाठी पाच गेटचे काम करणे गरजेचे आहे.

सर्व दरवाजांचे परिचरण योग्य पद्धतीने झाल्यानंतर धरणाच्या सेवा धोरणावर अतिरिक्त भार येणार नाही त्यामुळे पूर नियंत्रण करणे अधिक सोपे जाईल. - प्रवीण पारकर, उपविभागीय अधिकारी, राधानगरी धरण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरण