आर. के. नगरात तरुणीची नैराश्येतून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST2020-12-05T04:56:16+5:302020-12-05T04:56:16+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आर. के. नगरमध्ये उदय पालकर यांच्या घरामध्ये धनश्री जाधव गेले तीन वर्षे भाडेकरू ...

आर. के. नगरात तरुणीची नैराश्येतून आत्महत्या
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आर. के. नगरमध्ये उदय पालकर यांच्या घरामध्ये धनश्री जाधव गेले तीन वर्षे भाडेकरू म्हणून राहत होत्या. त्या शहरातील एका बॅंकेत क्रेडिट कार्ड मार्केटिंगचे काम करत होत्या. नोकरीच्या निमित्ताने त्या कोल्हापुरात राहत होत्या. बुधवारी रात्री त्यांनी राहत्या घरी स्लॅबच्या हुकाला असलेल्या फॅनला वायरीने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तिच्या रुमची तपासणी केली असता तेथे तिची रोजनिशीची डायरी सापडली. त्यामध्ये तिच्या आयुष्याबाबत मजकूर सापडला आहे. त्यावरून तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे दिसून येते. या आत्महत्येची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
(तानाजी)