शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘वारणा’चा प्रश्न सामोपचाराने मिटेल:राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:33 IST

इचलकरंजी : इचलकरंजी शहराची तहान भागविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास वारणा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास खासदार राजू ...

इचलकरंजी : इचलकरंजी शहराची तहान भागविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास वारणा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.इचलकरंजीत पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर व नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, बदलत्या काळानुसार आता व्यवसाय, नोकरी, शिक्षण, पर्यटनासाठी विमानसेवा आवश्यक झाली असून, त्यासाठी पासपोर्टची गरज आहे. त्यामुळे नागरिकांची ही गरज ओळखून इचलकरंजी शहरामध्ये पासपोर्ट सुविधा सुरू करण्यात आली आहे.देशातील ४०१ वा पुणे विभागातील १८ वे पासपोर्ट सेवा केंद्र इचलकरंजीत पोस्ट कार्यालयांतर्गत जुन्या नगरपालिकेत सुरू करण्यात आले.पासपोर्ट कार्यालयाचे पुणे विभागाचे अधिकारी अनंत ताकवले यांनी देशभरात ४०१ पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी परराष्टÑ मंत्रालयाचे तत्कालीन सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे इचलकरंजीतही कार्यालय सुरू होत असून, पासपोर्ट काढताना चुका टाळण्याचे आवाहन केले.नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी, शहराचे बहुतांश प्रश्न मार्गी लागल्याने इचलकरंजी स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत आहे. शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे असून, आमदार हाळवणकर आणि खासदार शेट्टी यांनी शहराची वारणा योजना मार्गी लावून पाणीप्रश्न सोडविण्याचे साकडे घातले.आमदार हाळवणकर यांनी, देशात ७० वर्षांत केवळ ७७ पासपोर्ट कार्यालये होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासपोर्ट कार्यालयांची गरज ओळखून अवघ्या पाच वर्षात ४०१ कार्यालये सुरू करण्याचा निर्धार केल्याने अनेक नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.कार्यक्रमास उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेवक अजित जाधव, प्रमोद पाटील, इचलकरंजी पोस्ट कार्यालय प्रमुख सी. डी. रानमाळे, सहायक प्रमुख संजय सामानगडकर, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार उपस्थित होते.