शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

सव्वा लाखाचा मारला हात, पोलीस वर्तुळात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 16:31 IST

लाच प्रकरण घडण्यापूर्वी आठवडाभर अगोदर याच मटका प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याने सुमारे सव्वा लाखाचा हात मारल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस खात्याने खोलवर जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देआठवड्यापूर्वीचे प्रकरण चव्हाट्यावरमटका प्रकरणात पोलीस खात्यात सफाईची गरज

तानाजी पोवारकोल्हापूर : जिल्ह्यात मटका बंद असा फक्त डंका पिटला गेला. प्रत्यक्षात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्रयाखाली गुपचूपपणे मटका सुरू असल्याचे लाच प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. लाच प्रकरण घडण्यापूर्वी आठवडाभर अगोदर याच मटका प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याने सुमारे सव्वा लाखाचा हात मारल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस खात्याने खोलवर जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.कोल्हापूर जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध व्यावसायिकांवर वचक ठेवला. त्यामुळे मटका, जुगारासह अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याचे वरवर दिसून आले असले तरीही काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका गुपचूपपणे सुरू होता.

विशेषत: राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका बंद होता म्हणणे आता धाडसाचे ठरणार आहे. गेल्यावर्षीही राजारामपुरीतच मटका सुरू असल्याचे मोबाईल शूटिंग व मटक्याच्या चिठ्ठया थेट पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्याचे धाडस एका सामाजिक कार्यकर्त्याने केले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यातील अंतर्गत अदलाबदल केले.

दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजारामपुरी परिसरात मटक्याचे कनेक्शन असल्याचे उघड केले. राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे प्रमुख पद अवघ्या चार महिन्यांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव यांनी घेतले आणि अख्ख्या डी.बी.पथकाचा खरा चेहरा चव्हाट्यावर आला. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षकाचे खरे रूप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केले हे कौतुकास्पद आहे.पण याच मटकाचालकांकडून अवघ्या आठवड्यापूर्वी आणखी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सुमारे सव्वा लाखाचा हात मारल्याचीही चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे. विशेष म्हणजे, या सव्वा लाखाचे दोन हिस्से करून त्याचे वाटपही केल्याचे समजते. अशा पध्दतीने खालच्या पोलिसापासून अधिकाऱ्यापर्यंत ही साखळी असल्याने ही साफसफाई करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या लाच प्रकरणात पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वक्रदृष्टी दाखवून चौकशीची गरज आहे.

सध्या संबंधित अधिकारी ह्यराम-नाथह्णचा जप करत स्वत:ला वाचवण्यासाठी मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत फोनाफोनी करत आहेत. त्या अधिकाऱ्याच्या पूर्वइतिहासातही झोकून पाहिल्यास अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलीस खात्यात सफाईची गरजवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून स्वत:चे खिसे भरणारे काही अधिकारी पोलीस खात्यात वावरत आहेत. एका बाजूला राजकारण्यांशी संबंध ठेवायचे, तर दुसऱ्या बाजूला वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आपली दबावाची नेहमीच कमांड ठेवण्याची अशी यांची ही कार्यपद्धत आहे. मटका प्रकरणात पाळेमुळे खणून अशा अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केला पाहिजे.मटका चालवत असल्याची कबुलीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राजारामपुरी छाप्यातील तक्रारदारानेच खुद्द एजंटाकरवी मटका चालवत असल्याची कबुली दिली. त्यामुळे हा मटका कोणाच्या आश्रयाखाली सुरू आहे, त्या मोठ्या माशापर्यंत पोहोचण्याचीही आवश्यकता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस