शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळची ताकद संजयच्या मागे लावा, मुख्यमंत्र्यांचा अरुण डोंगळे यांना फोन; ऑडिओ क्लिप झाली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 12:02 IST

गोकूळमधील सत्तेची सद्यस्थिती काय..

कोल्हापूर : गोकूळ दूध संघाची ताकद महायुतीतील शिंदेसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मागे लावा, असा थेट फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना केला. या मोबाइल संदेशाची क्लिप मुख्यमंत्री व डोंगळे यांच्या छायाचित्रासह तयार करून बुधवारी रात्री व्हायरल करण्यात आली. त्याच्या इंग्रजी ओळीमध्ये मुख्यमंत्र्यांना सीएम एकनाथ शिंदे कॉलिंग डोंगळे साहेब असे म्हटले आहे. गोकूळ दूध संघावर दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे. संघाचे नेतृत्व महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील आणि महायुतीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. संघाच्या संचालकाची तो ज्या गावचा आहे, त्या पंचक्रोशीत ताकद असते. दूध संस्थांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क असतो. दूध बिलामुळे शेतकऱ्यांचे, दूध उत्पादकांचे रोजचे जगणे संघाशी निगडित आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत गोकूळची ताकद सर्वच राजकीय पक्षांना हवी असते. आताही या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना या ताकदीची गरज भासली आहे. त्यामुळे त्यांनी अध्यक्ष डोंगळे यांना मोबाइलवर संपर्क साधला. मी एकनाथ शिंदे बोलतोय असे मुख्यमंत्री नुसते म्हणताच डोंगळे यांनी स्वत:हूनच आम्ही गोकूळची पूर्ण ताकद दोन्ही उमेदवारांच्या मागे लावतो. कोणत्याही स्थितीत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. ते सांगण्यासाठीच काल मी आपल्याला शाखेला भेटायला आलो होतो परंतु भेट झाली नाही. मात्र गोकूळची पूर्ण ताकद त्यांच्या मागे राहील, अशी व्यवस्था करतो. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला संजयला पूर्ण ताकदीने मदत करायची आहे, असे सांगितले. डोंगळे यांनी शंभर टक्के मदत करतो, असा शब्द मुख्यमंत्र्यांना दिला.

गोकूळमधील सत्तेची सद्यस्थिती काय..सध्या महाविकास आघाडीकडे बारा आणि महायुतीकडे दहा संचालक आहेत. चेतन नरके हे स्वत:च उमेदवार आहेत. तज्ज्ञ संचालकांसह चोवीसपैकी कोल्हापूर लोकसभा मतदार संघात १८ आणि हातकणंगले मतदार संघात ५ संचालकांचे कार्यक्षेत्र येते. सुमारे पाच लाख दूध उत्पादकांशी संघ जोडलेला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapur-pcकोल्हापूरbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेsanjay mandlikसंजय मंडलिकGokul Milkगोकुळ