अक्षर दालन प्रकाशनला पुष्पा पुसाळकर पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:36 IST2020-12-14T04:36:02+5:302020-12-14T04:36:02+5:30

कोल्हापूर : येथील अक्षर दालन प्रकाशनला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

Pushpa Pusalkar Award to Akshar Dalan Prakashan | अक्षर दालन प्रकाशनला पुष्पा पुसाळकर पुरस्कार

अक्षर दालन प्रकाशनला पुष्पा पुसाळकर पुरस्कार

कोल्हापूर : येथील अक्षर दालन प्रकाशनला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे झालेल्या समारंभामध्ये राजेंद्र बनहट्टी आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

अक्षर दालनच्या वतीने गतवर्षी डॉ. अमर आडके यांच्या ‘सह्याद्रीच्या गिरिशिखरावरून’ या दोन खंडांतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले होते. आकर्षक चाररंगी छपाई, वैविध्यपूर्ण किल्ल्यांची छायाचित्रे, वाचकाला आकृष्ट करणारी पुस्तकरचना आणि आशय यांचा विचार करून परीक्षण समितीने ‘अक्षर दालन’ची या पुरस्कारासाठी निवड केली. कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य प्रकाशन संस्था म्हणून ‘अक्षर दालन’ कार्यरत असून ‘निर्धार’च्या सहकार्याने आयोजित त्यांचा ‘अक्षरगप्पा’ हा उपक्रमही रसिकप्रिय ठरला आहे.

‘अक्षर दालन’चे अमेय जोशी, लेखक डॉ. अमर आडके आणि रचनाकार गौरीश सोनार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रकाश पायगुडे, प्रा. रूपाली अवसरे, सुनीता राजे पवार, जयदीप कडू, बंडा जोशी उपस्थित होते.

१३१२२०२० कोल अक्षर दालन

कोल्हापूर येथील अक्षर दालन प्रकाशनला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. राजेंद्र बनहट्टी, प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते अमेय जोशी, डॉ. अमर आडके, गौरीश सोनार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Web Title: Pushpa Pusalkar Award to Akshar Dalan Prakashan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.