पुष्कराजने जपला सामाजिक कार्याचा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:06+5:302021-07-05T04:16:06+5:30
कोल्हापूर : सध्याच्या कोरोना स्थितीमुळे गोरगरीब नागरिकांचे होत असलेले हाल पाहता सामाजिक भावनेतून वाढदिवसानिमित्त गोरगरीब नागरिकांना मदत करण्याचा वसा ...

पुष्कराजने जपला सामाजिक कार्याचा आदर्श
कोल्हापूर : सध्याच्या कोरोना स्थितीमुळे गोरगरीब नागरिकांचे होत असलेले हाल पाहता सामाजिक भावनेतून वाढदिवसानिमित्त गोरगरीब नागरिकांना मदत करण्याचा वसा यावर्षीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्याकडून जपला गेला.
पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कर्तव्य समजून रविवारी नो मर्सी ग्रुप व युवा सेनेच्या वतीने शहरातील सुमारे १०० गोरगरीब रिक्षा व्यावसायिक आणि गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक वस्तूच्या किटमध्ये तांदूळ, गहू, खाद्यतेल, तुरडाळ, मसुरा, साखर, चहापूड, मसाले आदी वस्तूंचा समावेश आहे.
लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमातील मुलांच्या विरंगुळ्यासाठी कार्यक्रम, अंधशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण, वृद्धाश्रमास फळे वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात. या कोरोनाच्या काळातही त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.
याप्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भगिनी मंच अध्यक्षा वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, रोहन घोरपडे, दिग्विजय साळुंखे, करण पोतदार, रोहित मेळवंकी, ओंकार वाले, करण मिरजकर, राजअहमद सय्यद, यश काळे, विराज चव्हाण, अमेय अतिग्रे, अरुण सावंत, रणजित जाधव, जयवंत हारुगले, अमित चव्हाण, सुनील खोत, अजित गायकवाड, सुनील जाधव, किशोर घाटगे, अश्विन शेळके, सनी अतिग्रे, इंद्रजित आडगुळे उपस्थित होते.
फोटो क्रमांक -०४०७२०२१-कोल-पुष्कराज क्षीरसागर
ओळ - कोल्हापुरातील नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष पुष्कराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त १०० रिक्षाचालकांना मदत देण्यात आली.