शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ला दे धक्का..!

By admin | Updated: October 20, 2014 00:40 IST

सगळीकडेच वाताहत : संघटना उरली केवळ आंदोलनापुरती

विश्वास पाटील - कोल्हापूर -लोकसभा निवडणुकीत स्वत:चा करिश्मा निर्माण करून देशभर चर्चेत आलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मात्र विधानसभा निवडणुकीत वाताहत झाली. कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेने पाच जागा लढविल्या होत्या. त्यापैकी एकाही मतदारसंघात त्यांचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर नाही. याचा अर्थच असा की लोक ऊस आंदोलनापुरते संघटनेचा झेंडा हातात घेतात, परंतु निवडणुकीत मात्र त्यांना हव्या असलेल्या झेंड्याच्या मागे जातात. स्वाभिमानी संघटनेचा विचार करता या निवडणुकीत त्यांच्या सगळ््या वजाबाक्याच झाल्या आहेत.शिरोळ हा शेट्टी यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ. विधानसभेच्या २००४च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा निवडणूक लढवूनही मातब्बरांचा पराभव करून विजयी झाले. परंतु त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत त्यांना आपल्या वारसदारांना विजयी करता आले नाही. या निवडणुकीत त्यांनी संघटनेच्या उमेदवारीचे नैसर्गिक हक्कदार उल्हास पाटील यांना बाजूला करून सावकर-मादनाईक यांना उमेदवारी दिली. शेट्टी यांनी आपल्या जातीच्या माणसाला उमेदवारी दिल्याचा प्रचार त्यातून झाला. महायुतीच्या राजकारणात शेट्टी भाजपच्या बाजूने राहिल्याचा राग म्हणून शिवसेनेने संघटनेचे बंडखोर उल्हास पाटील यांना लगेच उमेदवारी दिली. तिथे संघटनेचा हिशेब चुकता करण्यासाठी अनेक गट एकत्र आल्याने संघटनेचा दारूण पराभव झाला. लोकसभेला शेट्टी यांना मताधिक्य देणाऱ्या या मतदारसंघात विधानसभेला मात्र पराभव झाला. शेट्टी व काँग्रेसचे पराभूत आमदार सा. रे. पाटील यांच्यात मिलीभगत असल्याचा प्रचारही संघटनेस अडचणीचा ठरला.शाहूवाडीत शेट्टी यांना विनय कोरे व शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांना पराभूत करायचे होते. परंतु त्यात त्यांना निम्मेच यश आले. सत्यजित पाटील यांना ते रोखू शकले नाहीत. राधानगरी मतदारसंघात मात्र जालंदर पाटील यांना मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. पाटील हे जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना कशी-बशी सहा हजार मते मिळाली, तशीच स्थिती चंदगडला राजेंद्र गड्ड्याण्णावार यांची झाली. पोटनिवडणुकीनंतर आपण आमदार झालोच, अशा अविर्भावात राहिलेल्या गड्ड्याण्णावार यांचाही मोठा पराभव झाला. जिल्ह्यात स्वाभिमानीचे उमेदवार पराभूत झाले असले तरी कोल्हापूर दक्षिणमध्ये मात्र अमल महाडिक यांच्या विजयासाठी संघटनेची चांगली मदत झाली.'स्वाभिमानी'च्या उमेदवारांना मिळालेली मतेअनिल मादनाईक (शिरोळ) - ४८ हजार ५११ (तिसऱ्या स्थानावर)अमरसिंह पाटील (शाहूवाडी) - २७ हजार ८६६ (तिसऱ्या स्थानावर)जालंदर पाटील (राधानगरी) - ५ हजार ९१५ (तिसऱ्या स्थानावर)राजेंद्र गड्ड्याण्णावार (चंदगड)- १९ हजार ८४७ (सहाव्या स्थानावर)प्रमोद कदम (हातकणंगले) - २१ हजार ३१८ (चौथ्या स्थानावर)