कोल्हापूर येथील जेष्ठ उद्योजक पुरुषोत्तम मंत्री यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 11:58 IST2019-08-15T11:53:42+5:302019-08-15T11:58:14+5:30

कोल्हापूरमधील जेष्ठ उद्योजक मंत्री मेटेलीक्स ग्रुपचे चेअरमन पुरुषोत्तम कन्हैयालाल मंत्री यांचे गुरूवारी सकाळी सात वाजता निधन झाले .

purushottam mantri passes away in kolhapur | कोल्हापूर येथील जेष्ठ उद्योजक पुरुषोत्तम मंत्री यांचे निधन

कोल्हापूर येथील जेष्ठ उद्योजक पुरुषोत्तम मंत्री यांचे निधन

शिरोली/,कोल्हापूर - कोल्हापूरमधील जेष्ठ उद्योजक मंत्री मेटेलीक्स ग्रुपचे चेअरमन पुरुषोत्तम कन्हैयालाल मंत्री ( वय - 72 ,रा.शिवाजी पार्क, कोल्हापूर ) यांचे गुरूवारी (15 ऑगस्ट) सकाळी सात वाजता निधन झाले आहे. 

पुरुषोत्तम मंत्री यांनी शिरोली एमआयडीसी मध्ये 1995 मध्ये मंत्री मेटेलीक्स या नावाने आपल्या उद्योगाची सुरूवात केली होती. उद्योगाचा विस्तार शिरोली, कागल आणि उत्तरांचल या ठिकाणी वाढवला आहे. अनेक कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. गुरुवारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 
 

Web Title: purushottam mantri passes away in kolhapur