शाहूपुरीतील राहत्या घरातून पर्स लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST2021-08-15T04:24:57+5:302021-08-15T04:24:57+5:30

कोल्हापूर : शाहूपुरी चौथ्या गल्लीतील राहत्या घरातून अज्ञाताने सतराशे रुपये रोख रक्कम असलेल्या दोन पर्स लंपास केल्या. याबाबतची फिर्याद ...

Purse lamp from a house in Shahupuri | शाहूपुरीतील राहत्या घरातून पर्स लंपास

शाहूपुरीतील राहत्या घरातून पर्स लंपास

कोल्हापूर : शाहूपुरी चौथ्या गल्लीतील राहत्या घरातून अज्ञाताने सतराशे रुपये रोख रक्कम असलेल्या दोन पर्स लंपास केल्या. याबाबतची फिर्याद राजेश राजकुमार जैन (वय ५८, रा. व्दारका हाईट्स, शाहूपुरी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी जैन यांच्या शाहूपुरीतील राहत्या घरातील टेबलवर ठेवलेली एक मोठी व एक लहान पर्स अज्ञाताने लंपास केली.

विक्रमनगरातून मोटारसायकल लंपास

कोल्हापूर : विक्रमनगर नुराणी मस्जीदसमोर घराच्या दारात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याबाबतची फिर्याद प्रकाश देवगोडा चव्हाण (वय ३१, पट्टणकोडोली) यांनी राजारामपुरी पोलिसात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी चव्हाण यांनी विक्रम नगरातील घरासमोर आपली दुचाकी बुधवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उभी केली होती. रात्री पावणेबाराच्या सुमारास ती उभी केलेल्या ठिकाणी नव्हती. शोधाशोध करूनही दुचाकी सापडली नाही.

महाद्वार रोडवरून मोबाईल लंपास

कोल्हापूर : महाद्वार रोडवर एका इमिटेशन ज्वेलरीच्या स्टाॅलवर गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या खांद्यावरील बॅगेतून अज्ञाताने एटीएम कार्डसह मोबाईल लंपास केला. याबाबतची फिर्याद वैशाली देसाई (वय ४९, रा. माळी काॅलनी, टाकाळा) यांनी जुना राजवाडा पोलिसात दिली.

फिर्यादी या बुधवारी दुपारी साहित्य खरेदीसाठी गेल्या होत्या. या दरम्यान अज्ञाताने त्यांच्या खांद्यावरील बॅगेतून एटीएम कार्ड, १५ हजारांचा मोबाईल आणि तीन हजारांची रोख रक्कम लंपास केली. तपास पोलीस नाईक राऊत करत आहेत.

Web Title: Purse lamp from a house in Shahupuri