शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur: देवठाणे मठात भाविकांच्या अडचणींवर पौर्णिमेला दरबार; गोशाळेत गायींचा मृत्यू, कारभार आला संशयाच्या भोवऱ्यात

By उद्धव गोडसे | Updated: April 13, 2024 11:53 IST

गोशाळेच्या नावाखाली भाविकांकडून लाखो रुपये उकळले

उद्धव गोडसेकोल्हापूर : भाविकांच्या जीवनातील अडचणी सोडवण्याचा दावा करणारे श्री बाळकृष्ण महाराज यांनी देवठाणे येथे सुरू केलेल्या मठाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मठात सुरू केलेल्या गोशाळेच्या नावाखाली त्यांनी भाविकांकडून लाखो रुपये उकळले. मात्र, गायींच्या मृत्यूमुळे ती बंद पडली. मठाचे उत्पन्न किती, त्याचे काय केले जाते, राज्यात आणखी कुठे मठाच्या नावाखाली माया जमवली आहे काय? याचे गौडबंगाल वाढले आहे.नावातच देवाचे स्थानक असलेल्या देवठाणे गावाची निवड करून बाळकृष्ण महाराजांच्या वडिलांनी परिसरातील ग्रामस्थांवर भुरळ घातली. आपल्या मुलांमध्ये दैवी शक्ती असल्याच्या भूलथापा मारून त्यांनी मंदिर आणि मठाची कल्पना ग्रामस्थांच्या डोक्यात घातली. गोड बोलून दोन एकर जमीन मिळवली. २००३ मध्ये श्री स्वामी समर्थांच्या मंदिराची उभारणी केली. त्यानंतर दोन-तीन वर्षांनी मठाचे बांधकाम सुरू केले.या मठात दर पौर्णिमेला महाराज भक्तांना दर्शन देतात, त्यांच्या जीवनातील अडीअडचणी सोडवण्यासाठी कागदावर प्रश्न लिहून घेतात, त्यानंतर भक्तांना काही उपाययोजना सांगितल्या जातात. यासाठी सेवा मूल्य १०१ रुपये असल्याची सूचना मठात लिहिली असली तरी, भाविक स्वेच्छेने हजारो रुपये दानपेटीत टाकतात. पौर्णिमेनंतर महाराज मठातून बाहेर पडून गावोगावच्या भक्तांंकडे राहतात. त्यांच्याकडून मठासाठी लाखो रुपयांच्या देणग्या मिळवतात, अशी माहिती गावातून मिळाली.पुणे आणि सांगली जिल्ह्यातील काही भक्तांनी मठातील सभामंडप आणि हॉलचे बांधकाम करून दिले. हॉल आणि निवासस्थानाच्या बांधकामासाठी महाराजांनी दोन शेतकऱ्यांकडून पाच गुंठे जमीन घेतली. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी मठात गोशाळा सुरू केली. गोशाळेच्या नावाखाली अनेक भाविकांकडून पैसे उकळल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, योग्य देखभालीअभावी काही वर्षांतच तीन-चार गायी दगावल्या. त्यानंतर गोशाळा बंद केली.मठाची व्यवस्था पाहण्यासाठी इचलकरंजी येथील संतोष आडसुळे आणि त्याच्या पत्नीची नियुक्ती केली होती. अलीकडे हेच दाम्पत्य मठाचा कारभार पाहत होते. इतर सेवकांचीही अधूनमधून वर्दळ असे. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मठातील गैरकारभार स्थानिकांच्या फारसा नजरेत येत नव्हता. आता मात्र महाराजांचे कारनामे समोर येत असल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

वकिलाच्या कार्यालयात दर्शन दरबारकोल्हापुरात पापाची तिकटी परिसरातील एका वकिलाच्या कार्यालयात बाळकृष्ण महाराज भक्तांना दर्शन देत होते. अनेकदा त्यांचा दर्शन दरबार भरल्याची माहिती काही भाविकांनी दिली. शनिवार पेठेतील एका महिलेचे लाखो रुपये त्याने हडप केल्याचीही चर्चा सुरू आहे.

तपश्चर्या की बनाव?ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१५ या काळात महाराज तपश्चर्येसाठी बाहेर गेले होते, असे त्यांच्या भक्तांकडून सांगितले जाते. मात्र, ते नेमके कुठे गेले होते, याबाबत कोणीच काही सांगत नाही. ते अंतर्धान पावले आणि प्रकट झाले, एवढेच सांगितले जाते. तपश्चर्येला जाण्यापूर्वी आणि तपश्चर्या करून आल्यानंतरचे दोन फोटो मठात लावले आहेत. याबाबत माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याने संशय बळावला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस