धनादेश न वटल्यामुळे सहा महिन्यांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:16 IST2021-06-28T04:16:58+5:302021-06-28T04:16:58+5:30
कोल्हापूर : कर्ज रकमेचा दिलेला धनादेश न वटल्यामुळे कर्जदार आनंदा गणपतराव सावंत यांना सहा महिन्यांची शिक्षा फौजदारी अपिलेट न्यायालयाने ...

धनादेश न वटल्यामुळे सहा महिन्यांची शिक्षा
कोल्हापूर : कर्ज रकमेचा दिलेला धनादेश न वटल्यामुळे कर्जदार आनंदा गणपतराव सावंत यांना सहा महिन्यांची शिक्षा फौजदारी अपिलेट न्यायालयाने कायम केली.
पाटोळेवाडी येथील गजानन नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार आनंदा गणपतराव सावंत यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरणा करण्यासाठी संस्थेला एक लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश दिला होता. तो बँकेत जमा केला असता न वटता परत आल्याने संस्थेने फौजदारी न्यायालयामार्फत कारवाई केली होती. त्यावर न्यायालयाने सावंत यांना सहा महिन्यांची शिक्षा व एक लाख २५ हजार रुपये नुकसानभरपाई भरण्याची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात कर्जदाराने अपिलेट न्यायालयात अपील केले होते. मात्र, अपिलेट न्यायालयाने ही शिक्षा कायम केली. संस्थेतर्फे ॲड. ए. ए. पाटोळे यांनी काम पाहिले.