शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला ३१ मार्च अखेर मुदतवाढ

By संदीप आडनाईक | Updated: December 20, 2023 19:30 IST

रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचा निर्णय, 'लोकमत'च्या वृत्त मालिकेची दखल 

कोल्हापूर : कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर तातडीने चार फिरते स्वच्छतागृह बसवण्यात येणार असून पुणे- कोल्हापूर ही विशेष रेल्वे ३१ मार्च अखेर सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.अध्यक्षस्थानी रेल्वेच्या विभागीय प्रबंधक इंदूराणी दुबे होत्या. रेल्वे स्थानकावरील कामे संथ सुरू असल्याच्या तसेच प्रवाशांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या लोकमतच्या वृत्त मालिकेची दखल या बैठकीत घेण्यात आली. यावेळी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच स्थानकावर फिरते स्वच्छतागृह उद्या, गुरुवारी बसवण्यात येणार आहे.कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्जीवनाचे काम अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू आहे, मात्र या कामाला अद्याप गती मिळालेली नाही, या शिवाय प्रवासांच्या अनेक गैरसोयी दूर करण्याची मागणी या बैठकीत रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी केली. या बैठकीला बियाणी यांच्यासह मिरजेचे किशोर बोरावत, निखिल कांची, बशीर सुतार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मिलिंद हिरवे, जन संपर्क अधिकारी रामपाल बडबग्गा उपस्थित होते. विशेषत: रेल्वे स्थानकावर नवीन स्वच्छतागृह बंद केल्याने प्रवाशांची कुचंबणा होत असल्याचा मुद्दा यावेळी चर्चेत घेण्यात आला. यावर नियमित काम पूर्ण होईपर्यंत तातडीने चार फिरते स्वच्छतागृह सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी तत्काळ म्हणजे उद्याच करण्यात येणार आहे.पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वे ३१ मार्चपर्यंत दरम्यान, पुणे-कोल्हापूर ही विशेष रेल्वे ३१ डिसेंबर पर्यंत धावणार होती. याबाबत प्रवासी संघटनेने रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्याला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ही गाडी रेल्वे मार्गाचे दुहेरिकरण झाल्यानंतरच सुरू करण्याचा रेल्वेचा विचार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेrailwayरेल्वे