शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन; वाहतुकीत बदल, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:37 IST

आंदोलन मागे घेण्यासाठी राजू शेट्टींना नोटीस

कोल्हापूर : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज मंगळवारी शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे-बंगळूरू महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे तब्बल दोन तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक वळवण्यात आल्याने शहरासह पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 

आंदोलनादरम्यान, काही शेतकऱ्यांनी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस प्रशासनाने वेळीच अटकाव केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, यावेळी घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महामार्गावरील वाहतुकीत बदलमहामार्गावर वाहनांची कोंडी टाळण्यासाठी कागलकडून पुण्याकडे जाणारी वाहने लक्ष्मी टेक येथून पंचतारांकित एमआयडीसीमार्गे इचलकरंजी, हातकणंगलेमार्गे सांगली आणि पेठवडगाव, वाठारमार्गे पुण्याकडे सुरु होती. काही वाहने उजळाईवाडी येथून शाहूनाकामार्गे कसबा बावडा, शिये फाटा येथून पुण्याच्या दिशेने सोडली गेली. कागलच्या दिशेने जाणारी वाहने वाठार येथून पेठवडगाव, इचलकरंजीमार्गे पुढे कागलच्या दिशेने वळवण्यात आली होती. काही वाहने शिये फाटा येथून शहरातील जुन्या महामार्गावरून पुढे कागलच्या दिशेने सुरु होती. बंदोबस्तासाठी ३०० पोलिसया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३०० पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महामार्गावर वाहनांची कोंडी होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना अधीक्षक योगेश कुमार यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

आंदोलन मागे घेण्यासाठी राजू शेट्टींना नोटीसआंदोलनाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना नोटीस पाठवली आहे. जिल्ह्यात बंदी आदेश लागू असल्याने आंदोलन करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

शेतकऱ्याने नदीत उडी मारण्याचा केला प्रयत्न