शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग: औद्योगिक क्षेत्रात नवे बोगदे, विस्तारीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:01 IST

सतीश पाटील  शिरोली : कागल-सातारा या १३३ किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे सध्या सहापदरीकरण सुरू आहे. या मध्ये वारणा नदी ते ...

सतीश पाटील शिरोली : कागल-सातारा या १३३ किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे सध्या सहापदरीकरण सुरू आहे. या मध्ये वारणा नदी ते कागल या २९ किलोमीटर अंतरावरील अनेक ठिकाणी मोठे बोगदे तर काही ठिकाणी बदल होणार आहेत. मंगरायाचीवाडी, मेनन‌ पिस्टन, नागाव फाटा, सांगली फाटा, याठिकाणी २५ मिटरचे तर उचगाव, उजळाईवाडी, कणेरीवाडी याठिकाणी २० मिटरचे बोगदे होणार आहेत.मंगरायचीवाडी येथे नवीन लहान औद्योगिक वसाहत विस्तारीत होत आहे, तसेच दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची असलेली शेती, यामुळे याठिकाणी स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी केली, शिरोली एम आय डी सी मध्ये मोठे मालवाहतूक गाड्या येण्यासाठी आणि जाण्यासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) आणि उद्योजकांची मागणी होती. त्यामुळे याठिकाणी बोगदा होणार आहे. तसेच नागाव फाटा येथे मोठा अपघात स्पाॅट असल्याने तसेच दोन्ही बाजूला ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्याने मोठ्या व्यावहारिक गाड्यांची रेलचेल असते तसेच नागाव आणि शिरोली गावातील स्थानिक लोकांच्यासाठी याठिकाणी बोगद्याचे काम सुरू आहे. शिरोली सांगली फाटा येथे सांगलीला जाण्यासाठी जुना एक मार्गी मोठा बोगदा होता. आता दोन्ही बाजूला बोगदा याठिकाणी होत आहे.तसेच उचगाव फाटा येथे हुपरी ला जाराणारा मार्गावर सध्या लहान बोगदा असल्याने सतत याठिकाणी वाहतूक कोंडी होते. याठिकाणचा सध्याचा बोगदा पाडून नवीन  २० मिटरचा बोगदा केला जाणार आहे. उजळाईवाडी, के आय टी, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी याठिकाणी २० मिटरचा बोगदा केला जणार आहे.

शिरोली एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग आहेत याठिकाणी दररोज मालवाहतूक गाड्या येतात आणि जातात या गाड्यांसाठी मोठा बोगदा पाहिजे तसेच एमआयडीसी ला मोठे प्रवेशद्वार असणे आवश्यक होते. याबाबत स्मॅकने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी मागणी केली होती - सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक  

मंगरायाचीवाडी येथे दोन्ही बाजूला खाजगी लघू औद्योगिक वसाहत वसली आहे. याठिकाणी दोन्ही बाजूला स्थानिक लोकांची शेती आहे. म्हणून याठिकाणी मोठा बोगदा‌ होणे गरजेचे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा बोगदा मंजूर करून घेतला आहे. - सुमंत पाटील, उद्योजक,  प्राईम इस्टेट 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गPuneपुणे