सिध्रेण" ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:51 AM2020-11-19T11:51:18+5:302020-11-19T11:52:21+5:30

literature, Religious programme, kolhapur हार्दायन, श्री दत्त देवस्थान मठ, आडी, ता. निपाणी, जि. बेळगांव येथील परमपूज्य परमात्मराज महाराज लिखित, कोरोना महामारीवर आधारित सिध्रेण या ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन सोमवार दि. 16 नोव्हेंबरला पार पडले. दत्तगुरूंच्या पादुकांवर ग्रंथ अर्पण करून हे प्रकाशन झाले.

Published the fourth edition of the book "Sidhren" | सिध्रेण" ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रकाशित

परमपूज्य परमात्मराज महाराज लिखित 'सिध्रेण' ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन परमपूज्य परमात्मराज महाराज व देविदास महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले

Next
ठळक मुद्देसिध्रेण" ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रकाशित

बाबासो हळिज्वाळे

कोगनोळी : हार्दायन, श्री दत्त देवस्थान मठ, आडी, ता. निपाणी, जि. बेळगांव येथील परमपूज्य परमात्मराज महाराज लिखित, कोरोना महामारीवर आधारित सिध्रेण या ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन सोमवार दि. 16 नोव्हेंबरला पार पडले. दत्तगुरूंच्या पादुकांवर ग्रंथ अर्पण करून हे प्रकाशन झाले.

कोवीड -19 महामारी संबंधाने जनतेला योग्य मार्गदर्शन मिळून समाधान वाटावे तसेच त्यांच्या मनात असणारे महामारी विषयीचे अनेक गैरसमज, अनावश्यक भीती, तणाव निघून जाऊन सत्यज्ञान जनतेपर्यंत पोहचावे, सकारात्मकता वाढावी, हा या ग्रंथाचा उद्देश आहे. त्यासाठी विज्ञानसिद्ध व अनेक शास्त्रांतील अभ्यासपूर्ण ज्ञान, त्याचे सुगूढ चिंतन यामध्ये आहे. त्याचबरोबर अध्यात्मातील सत्यसिद्धांतही मांडण्यात आलेले आहेत.

दिनांक 24/6/2020 ला ह्लसिध्रेणह्व हा लघुकाय महान् ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला. जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि ग्रंथाला होत असलेल्या मागणीमुळे आता चौथी आवृत्ती काढण्यात आली आहे. सिध्रेण ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी देवीदास महाराज, ब्र. नामदेव महाराज, ब्र. श्रीराम महाराज, ब्र. अमोल महाराज, ब्र. ज्ञानेश्वर महाराज, ब्र.चिदानंद महाराज, ब्र. मारुती महाराज, ब्र. समाधान महाराज, ब्र. श्रीधर महाराज व आश्रमस्थ विद्यार्थी उपस्थित होते.

हा सिध्रेण ग्रंथ या महामारीच्या काळात तर उपयोगी आहेच त्यासोबतच आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटांच्या वेळीसुद्धा अतिशय गरजेचा आहे. कारण यामध्ये विविध दृष्टांत देत माणसांचं मनोधैर्य, आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रंथ एक खूप मोठे मानसिक बळ, आधार देतो. जीवन जगण्यासंबंधीचा सकारात्मक दृष्टिकोण ठेवण्यासाठी, जीवननियोजनासाठी तसेच अनावश्यक ताण-तणावातून मुक्ततेसहित पारमार्थिक जीवनासाठीसुद्धा हा ग्रंथ साहाय्यभूत होऊ शकतो.

आज हा सिध्रेण ग्रंथ परत प्रकाशित करण्यात आल्याने सर्वांसाठी पुन्हा उपलब्ध झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने ग्रंथ मागवणाऱ्यांसाठी इतर ग्रंथांप्रमाणेच हा सिध्रेण ग्रंथही ॲमेझॉन वरती ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या कोरोना महामारीच्या काळातही तो दूरच्या लोकांनाही सहजपणे उपलब्ध होत आहे.
 

Web Title: Published the fourth edition of the book "Sidhren"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app