जाखलेत धनगर समाजाला ढोल प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST2021-09-12T04:28:45+5:302021-09-12T04:28:45+5:30
वारणानगर - जाखले (ता. पन्हाळा) येथील धनगर समाजाला आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते धनगरी ढोल प्रदान करण्यात आला. जाखले ...

जाखलेत धनगर समाजाला ढोल प्रदान
वारणानगर - जाखले (ता. पन्हाळा) येथील धनगर समाजाला आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते धनगरी ढोल प्रदान करण्यात आला.
जाखले येथील विशेष कार्यकारी अधिकारी व जाखले-बहिरेवाडी पाणी-पुरवठा संस्थेचे संचालक महादेव देशमुख यांच्या पुढाकारातून धनगर समाजाला पाच धनगरी ढोल अध्यक्ष ईश्वर शिंदे यांच्याकडे दिले. पश्चिम पन्हाळ्यातील जनसुराज्यचे युवा सरपंच कै. नितीन पाटील फाऊंडेशनला पाच हजारांचा धनादेश महादेव देशमुख यांनी कोरे यांच्याकडे दिला.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, माजी सभापती रणजित शिंदे-सरकार, डॉ बी. टी. साळोखें, विश्वास जाधव, राहुल देशमुख, भैय्या साळोखे, संदीप खोंद्रे, सदस्य दीपक शिंदे, सरदार देशमुख, आशुतोष माने, अरुण बोराटे, तानाजी चौगुले, अशोक देशमुख इतर पदाधिकारी उपस्थित होते.