शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार मारहाणीचे संतप्त पडसाद; शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांच्या अटकेसाठी कोल्हापुरात निदर्शने

By पोपट केशव पवार | Updated: May 10, 2024 17:52 IST

प्रेस क्लबचे शिष्टमंडळ मुरगुडात जाणार

कोल्हापूर : महिलांकडून झालेल्या मारहाणीबाबत लावलेली बातमी आपल्या विरोधात लावली म्हणून मुरगुड (ता.कागल) येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना शिवसेना शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी साथीदारांसह भरचौकात मारहाण केल्याची घटना घडली. याचे संतप्त पडसाद जिल्ह्यात सर्वत्र उमटले. कोल्हापूर प्रेस क्लबच्या बैठकीत जमादार यांचा तीव्र निषेध करण्यात आला.दरम्यान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करतानाही पोलिस ठाण्याबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून पत्रकारांवर दहशत आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या राजेखान जमादार यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी आज, शुक्रवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दसरा चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी जमादार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पत्रकारांनी दसरा चौक दणाणून सोडला.जमादार यांच्याविरोधात गुन्हा दाखल माझ्यासंबंधीची बातमी का छापली म्हणत राजेखान जमादार व त्यांच्या दोन सहकऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार तिराळे यांना मारहाण केली. तिराळे यांच्या तक्रारीवरून जमादार यांच्याविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्यापही जमादार यांना अटक न झाल्याने कोल्हापूर प्रेस क्लबच्या सभासदांनी याविरोधात आवाज उठवत दसरा चौकात निदर्शने केली. 'जमादार यांना अटक करा, नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी', अशा घोषणा देत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांनी जमादार यांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, विश्वास पाटील, भारत चव्हाण, सुखदेव गिरी, तानाजी पोवार, समीर मुजावर, लुमाकांत नलवडे, रणजित माजगावकर, सुनील पाटील, विजय पाटील यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.प्रेस क्लबचे शिष्टमंडळ मुरगुडात जाणारराजेखान जमादार यांची भाषा मग्रुरीची आहे. यापूर्वीही ते अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरले आहेत.त्यांच्यावर गुन्हा दाखल होतानाही त्यांनी पत्रकारांवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याची ही दहशत मोडून काढण्यासाठी तसेच गुन्हा दाखल होऊनही कारवाई होत नसल्याने कोल्हापूर प्रेस क्लबकडून पूर्ण ताकतीनिशी पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यामागे उभे राहण्याची भूमिका घेतली. यासाठी कोल्हापूर प्रेस क्लबचे शिष्टमंडळ दोन दिवसांत मुरगुड येथे जाऊन तिराळे यांना पाठबळ देणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJournalistपत्रकारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस