कोल्हापूर : रस्त्यांसाठी खर्च केलेल्या निधीची चौकशी करावी, या मागणीसाठी खड्ड्यामध्ये पणती लावून उद्धवसेनेच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री अभिनव आंदोलन करत रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. यावेळी आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी घोषणा देत सरकारचा निषेध केला. जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.दिवाळीच्या सणाला नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नवीन वाशी नाका परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यात रांगोळ्या काढून तसेच पणत्या लावून उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री शहरातील सर्वच रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधून घेतले.या आंदोलनात विशाल देवकुळे, सागर साळोखे, हर्षल पाटील, पप्पू नाईक, समरजित जगदाळे, अमित पै, गोविंद वाघमारे, विकास बुरबुसे, संजय खराटे, जयंवत पाटील, रुद्र पाटील, भूषण मिटके आदी उपस्थित होते.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/955114250288789/}}}}
Web Summary : Shiv Sena protested against Kolhapur's pothole-ridden roads by lighting lamps. They demanded an inquiry into road construction funds, drawing attention to poor conditions during Diwali. Activists raised slogans and criticized the government.
Web Summary : शिवसेना ने कोल्हापुर की गड्ढों वाली सड़कों के खिलाफ दीये जलाकर विरोध प्रदर्शन किया। उन्होंने सड़क निर्माण निधि की जांच की मांग की, और दिवाली के दौरान खराब स्थितियों पर ध्यान आकर्षित किया। कार्यकर्ताओं ने नारे लगाए और सरकार की आलोचना की।