शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 13:44 IST

सरकारवर दबाव आणूया : बाबा इंदूलकर, आंदोलनात सहभागी होण्याचा शिवाजी पेठेचा निर्धार

कोल्हापूर : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून द्या, ओबीसी यादीचे पुनर्निरीक्षण करा, ओबीसीचे फुगीर आरक्षण रद्द करा, या मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज, बुधवार, दि. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खास बांधलेल्या भव्य मंडपात सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदाेलनाविषयी कोल्हापुरात मोक्याच्या ठिकाणी भव्य फलक लागले आहेत.मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रतर्फे मराठा समाजाच्या सहा मागण्यांसाठी आज, बुधवारी मुंबईत आझाद मैदानात एकदिवसीय आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून कोल्हापुरात धरणे आंदोलन होत आहे.या आंदोलनाच्या तयारीसाठी उभा मारुती चौकात समितीने घेतलेल्या तयारीच्या बैठकीत ‘ज्याचे गाव, त्याचे नेतृत्व’, ‘ज्याचा विचार, त्याचा पुढाकार’, ‘लढा समाजाचा, जोश युवा तरुणाईचा’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या बैठकीत शिवाजी पेठेतील सर्व तालमी, तरुण मंडळे आणि संघटनांनी एकजुटीने या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार केला.ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, मराठ्यांना कोर्टात टिकणाऱ्या आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे, यासाठी कोल्हापुरातून नव्या क्रांतीला सुरुवात करायची आहे. पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा, याविषयी चर्चा करण्यासंदर्भात एकत्र यावे. सुजित चव्हाण, महेश जाधव, बाबा महाडिक, बाळ घाटगे, प्रा. मधुकर पाटील, अजित घाटगे, राजू सावंत, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, सुधा सरनाईक यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी माजी महापौर शोभा बोंद्रे, ॲड. अशोकराव साळोखे, बाबा पार्टे, तुकाराम इंगवले, सतीश खाडे, अनिल घाटगे, किरण माने, इंद्रजित बोंद्रे, रमाकांत आंग्रे, रणजित खराडे, विकास जाधव, किशोर घाटगे, प्रसन्न शिंदे, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या, तालमी, संघटना आणि तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन