शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरातील निवासस्थानी सीमा भागातील कार्यकर्ते जमा, प्रचंड पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:23 IST

सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याचा निषेध करण्यासाठी सीमा भागातील कार्यकर्ते मोर्चाने महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या निवासस्थानी जमा होत आहेत.

ठळक मुद्देचंद्रकांतदादांच्या निषेधासाठी कोल्हापूरातील निवासस्थानी सीमा भागतील कार्यकर्ते जमानिवासस्थानी प्रचंड पोलिस बंदोबस्तबेळगावातील सोशल मीडियात पाटील यांचा निषेध समन्वयक मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी

कोल्हापूर : सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याचा निषेध करण्यासाठी सीमा भागातील कार्यकर्ते मोर्चाने महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या निवासस्थानी जमा होत आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी बेळगावहून निघालेले कार्यकर्ते आताच कोल्हापूरात पोहोचले असून त्यांना रोखण्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त मागविण्यात आलेला आहे.महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारची कन्नडसक्ती सुरू असताना महाराष्ट्रातील मंत्र्यानेच कन्नडमधून गीत गायल्याने नवा वाद सुरू झाला आहे.

यामुळे सीमाभागातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी युवा मंच एकीकरण समितीने याचा निषेध केला असून बेळगावातील सोशल मीडियात देखील पाटील यांचा निषेध होत आहे.दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांची समन्वयक मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि येळ्ळूर विभाग समितीचे राजू पावले यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांनीही चंद्रकांतदादा पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस