पुरवठा कार्यालयात शहीद दिन साजरा न केल्याच्या निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:11+5:302021-03-24T04:23:11+5:30
इचलकरंजी : येथील पुरवठा कार्यालयामध्ये शहीद दिन साजरा न केल्याच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी निदर्शने केली. दरम्यान, पुरवठा अधिकारी पत्रकारांशी ...

पुरवठा कार्यालयात शहीद दिन साजरा न केल्याच्या निषेध
इचलकरंजी : येथील पुरवठा कार्यालयामध्ये शहीद दिन साजरा न केल्याच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी निदर्शने केली. दरम्यान, पुरवठा अधिकारी पत्रकारांशी संवाद साधताना हा स्टंटबाजीचा प्रकार असल्याचे बोलताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना धारेवर धरत धरणे आंदोलन केले.
शहीद दिनानिमित्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुरवठा कार्यालयाची स्वच्छता करून स्तंभाला अभिवादन केले. त्यावेळी त्यांना पुरवठा कार्यालयामार्फत शहीद दिन साजरा न केल्याचे निदर्शनास आले. याबाबत अधिकारी अमित डोंगरे यांना जाब विचारला. दरम्यान, पत्रकारांनी शहीद दिनासंदर्भात विचारले असता हा भाजपचा स्टंट असल्याची टीका डोंगरे यांनी केली. हे ऐकून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी डोंगरे यांना जाब विचारला. त्यावर डोंगरे यांनी घूमजाव केले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. अखेर माफी मागण्याच्या तडजोडीवर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात पै. अमृत भोसले, प्रमोद बचाटे, अरविंद चौगुले, प्रदीप मळगे, प्रवीण पाटील, मनोज तराळ आदी सहभागी झाले होते.