शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन, पोलिस-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

By राजाराम लोंढे | Updated: February 21, 2025 13:45 IST

कोकाटेंनी माफी मागावी अन्यथा हिसका दाखवू

कोल्हापूर : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना शाहूपुरी पोलिसांनी आज, शुक्रवारी ताब्यात घेतले. मंत्री कोकाटे कोल्हापूरात येण्यापुर्वीच चर्चेसाठी बोलावलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि पोलिस व त्यांच्यात जोरदार झटापट, धक्काबुक्की झाली. जोपर्यंत मंत्री कोकाटे हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना ‘स्वाभिमानी’ हिसका दाखवू, असा इशाराही यावेळी दिला.एक रुपया भिकारीही घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना त्या पैशात पीक विमा देतो, असे वक्तव्य मंत्री कोकोटे यांनी केले होते. त्याचे पडसाद राज्यभर उमटले असून स्वाभिमानी'ने याविरोधात आंदोलन उभारले आहे. मंत्री कोकाटे हे शुक्रवारी कोल्हापूरात येणार म्हटल्यानंतर संघटनेने त्यांच्याविरोधात आंदोलन करुन जाब विचारण्याचा इशारा दिला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत मंत्र्यांसोबत चर्चा करण्याची ग्वाही दिली होती. त्यासाठी, संघटनेच्या कार्यकर्त्यांना शासकीय विश्रामगृहात ही बोलावले होते. मंत्री कोकाटे हे दुपारी साडे बारा वाजता कोल्हापूरात येणार असल्याने संघटनेचे पदाधिकारी तिथे पोहचले, ते विश्रामगृहाच्या बाहेर चहा घेत असतानाच पोलिसांनी झडप टाकून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने गोंधळ उडाला. शेतकरी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांसोबत त्यांची झटापट व धक्काबुक्की झाली. पोलीस व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केल्याने वातावरण काहीकाळ तणावपुर्ण बनले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरministerमंत्रीManikrao Kokateमाणिकराव कोकाटेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलनPoliceपोलिस