शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘वेलनेस स्पा’मध्ये वेश्या व्यवसाय, एकास अटक; हप्त्यासाठी माजी नगरसेवकाचा दबाव?

By उद्धव गोडसे | Updated: June 25, 2024 16:03 IST

छापा टाकून शाहूपुरी पोलिसांची कारवाई, दोघांवर गुन्हा

कोल्हापूर : शाहूपुरी येथील तिसऱ्या गल्लीत वेलनेस स्पामध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. स्पा चालक नागेश रमेश बेळन्नावर (वय ३२, मूळ रा. हिप्पगिरी विजापूर, ता. चडचण, जि. विजापूर) आणि जागा मालक दत्तात्रय गणपती शिंदे (रा. शाहूपुरी, ३ री गल्ली) या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेळन्नावर याला अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. सोमवारी (दि. २४) रात्री आठच्या सुमारास कारवाई झाली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी वस्तीत स्पाच्या नावाखाली वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री छापा टाकून झडती घेतली असता, दोन पीडित महिला आढळल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, स्पा चालक बेळन्नावर याने पीडित महिलांचा गैरफायदा घेऊन वेश्या अड्डा चालवल्याची माहिती समोर आली.पोलिसांनी पीडित महिलांची सुटका करून स्पा चालक बेळन्नावर याला अटक केली. स्पासाठी जागा देणारा मालक दत्तात्रय शिंदे याच्यावरही गुन्हा दाखल केला. बेळन्नावर याच्यावर यापूर्वीही अवैध मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई झाली आहे.

हप्त्यासाठी माजी नगरसेवकाचा दबाव?वेलनेस स्पा सुरू ठेवण्यासाठी परिसरातील एका माजी नगरसेवकाने स्पा चालकावर दबाव टाकला होता. एका सामाजिक संघटनेमार्फत तो तक्रारी करीत होता, अशी प्राथमिक माहिती चौकशीत समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवैध व्यावसायिकांकडून खंडणी उकळणा-यांवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस