शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
5
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
6
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
7
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
8
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
9
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
10
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
11
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
12
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
13
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
14
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
15
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
16
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
17
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
18
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
19
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
20
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका

पेठ-सांगली सहापदरीकरणाच्या प्रस्तावास गती

By admin | Updated: August 16, 2016 23:32 IST

भूसंपादनावर भवितव्य : दोन तालुक्यांच्या प्रगतीला मिळेल बळ; शहरांमधील वाहतुकीचा भार कमी करण्यास उपयोग

सांगली : वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पेठ-सांगली रस्त्याच्या सहापदरीकरणाचा नवा प्रस्ताव आता चर्चेत आला आहे. पेठपासून थेट म्हैसाळपर्यंतच्या सहापदरी रस्त्याचे काम प्रस्तावित असल्याने वाळवा, मिरज तालुक्याच्या प्रगतीच्यादृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. रस्त्याची लांबी मोठी असल्याने याठिकाणच्या भूसंपादनावर कामाचे भवितव्य अवलंबून आहे. सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाचा २५0 कोटींचा प्रस्ताव यापूर्वी पाठविण्यात आला होता. चौपदरीकरणाच्या कामात दोन्ही बाजूस ९ मीटरचा रस्ता प्रस्तावित होता. या रस्त्याचे काम काहीअंशी पूर्ण झाले असले तरी वाढत्या वाहनांचा विचार करता, चौपदरीकरणाचा फारसा उपयोग होणार नाही, असाही सूर उमटत आहे. शंकांच्या याच गर्दीतून सहापदरीकरणाचा नवा प्रस्ताव तयार झाला. आ. सुधीर गाडगीळ यांनी पेठ-सांगली-मिरज-म्हैसाळ असा मोठा मार्ग सहापदरी करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गडकरी यांनीही याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितल्याने या प्रस्तावाला आता गती आली आहे. तांत्रिक गोष्टींसह लवकरच हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. सहापदरीकरण करतानाच कृष्णा नदीवर दोन स्वतंत्र पुलांचा उल्लेखही करण्यात आला आहे. यापूर्वी चौपदरीकरणाला भूसंपादनाचा कोणताही अडथळा आला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेतच चौपदरीकरणाचा आराखडा पूर्ण झाला होता. त्यामुळे मंजुरीच्या पातळीवर प्रस्तावाला गती मिळाली होती. सहापदरीकरण करताना या मार्गावर मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन करताना नुकसानभरपाईचा नवा कायदाही लागू होईल. त्यामुळे सहापदरीचा खर्च कित्येक पटीने वाढणार आहे. शासनाने खर्चाच्या मोठ्या शक्यतेलाही अनुकूलता दर्शविली, तर सहापदरीकरणाचे स्वप्न सत्यात उतरू शकते. पेठ-सांगलीपर्यंतच्या शेतजमिनीबरोबरच सांगली, मिरजेतील गावठाणातील, विस्तारित भागातील रहिवासी जमिनीही ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे या सर्व अडचणींवर मात करावी लागणार आहे. तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्यामते सहापदीरकरणाचे काम मंजूर झाले, तर हा रस्ता दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्याच्याच प्रगतीसाठी लाभदायी ठरणार आहे. कृष्णा नदीवरील प्रस्तावित दोन पुलांमुळे आणि शहरातील सहापदरी रस्त्याच्या अस्तित्वामुळे वाहतुकीचा मोठा भार कमी होणार आहे. अपघातांचे प्रमाण यामुळे कमी होण्याची शक्यताही आहे. (प्रतिनिधी)रस्ता मोठा : भूसंपादनही अधिकपेठ ते सांगली हा रस्ता सुमारे ४0 किलोमीटर अंतराचा आहे. सांगली ते म्हैसाळ हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. सहापदरीकरणाअंतर्गत एकूण ६२ किलोमीटरचे काम करावे लागेल. सहापदरीकरणाअंतर्गत दोन्ही बाजूस १५ मीटर अंतराचा अंतर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा मीटर अंतरातील जमिनी संपादित कराव्या लागतील. शासकीय नोंदीनुसार सांगली-पेठ रस्त्यावर प्रतिदिन ७५ ते ८0 हजार टन वाहतुकीचा भार आहे. वाढती वाहने, त्यांचा भार याबाबतचा विचार केल्यास सहापदरीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. रस्ता मोठा : भूसंपादनही अधिकपेठ ते सांगली हा रस्ता सुमारे ४0 किलोमीटर अंतराचा आहे. सांगली ते म्हैसाळ हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. सहापदरीकरणाअंतर्गत एकूण ६२ किलोमीटरचे काम करावे लागेल. सहापदरीकरणाअंतर्गत दोन्ही बाजूस १५ मीटर अंतराचा अंतर्भाव होण्याची शक्यता आहे. म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा मीटर अंतरातील जमिनी संपादित कराव्या लागतील. शासकीय नोंदीनुसार सांगली-पेठ रस्त्यावर प्रतिदिन ७५ ते ८0 हजार टन वाहतुकीचा भार आहे. वाढती वाहने, त्यांचा भार याबाबतचा विचार केल्यास सहापदरीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पेठ-सांगली-मिरज-म्हैसाळ या ६२ किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण करावेसीआरएफ (सेंट्रल रोड फंड) मधून काम मंजूर करावेकृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला दोन पर्यायी पूल याच कामातून मंजूर व्हावेतएक पूल कोल्हापूर रस्ता ओलांडून हरिपुरजवळून नदीवर उभारावा व सांगलीवाडी, समडोळीपासून पुढे प्रस्तावित करावादुसरा पूल पांजरपोळमार्गे कृष्णा नदीवर व्हावा