शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक पदांचा प्रस्ताव धूळखात; चंद्रकांतदादा आपले, तरीही विद्यापीठावर अन्याय का?

By पोपट केशव पवार | Updated: January 2, 2024 13:54 IST

वाढपी आपला असूनही ताट रिकामेच

पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या सहायक प्राध्यापक भरतीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली असताना शिवाजी विद्यापीठाचा रिक्त ७२ पदांचा प्रस्ताव मात्र अद्यापही धूळखात पडला आहे. या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटीलकोल्हापूरचे असतानाही या पदांच्या भरतीला मान्यता का मिळत नाही? असा सवाल शिक्षणक्षेत्रातून विचारला जात आहे.

शिवाजी विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापकांची १२५ पदे रिक्त आहेत. त्यातील ७२ पदांचे रोस्टर तयार करून तो प्रस्ताव विद्यापीठाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविला आहे; मात्र अद्याप या प्रस्तावाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिलेली नाही. विद्यापीठात २०१४ पासून पूर्णवेळ सहायक प्राध्यापक भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक विभागांत कंत्राटी प्राध्यापकांवर ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे.विविध विभागांत पूर्णवेळ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. याचा अध्यापनावर परिणाम होत असून, शैक्षणिक दर्जा ढासळत आहे. उपलब्ध प्राध्यापकांवरही ताण येत असल्याचे चित्र आहे. पूर्णवेळ प्राध्यापक निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापक भरती केली. सध्या १२५ हून अधिक कंत्राटी प्राध्यापक आहेत; मात्र पूर्णवेळ सहायक प्राध्यापक भरतीला कधी मुहूर्त लागणार? असा सवाल उपस्थित होत आहे.असे आहे विद्यापीठातील चित्रमंजूर पदे- २६२, भरलेली पदे- १३७, रिक्त पदे- १२५, किती पदांना मान्यता मिळेल- ७२, विद्यापीठात कार्यरत कंत्राटी सहायक प्राध्यापक - १२५.

वाढपी आपला असूनही ताट रिकामेचवाढपी आपला असला की थोडे अधिकचे मिळते, हा सार्वत्रिक अनुभव. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते आल्यानंतर शिवाजी विद्यापीठाला काही अधिकचे मिळेल, अशी अपेक्षा कोल्हापूरकरांनी ठेवली होती; मात्र विद्यापीठासमोरील प्रस्तावित भुयारी मार्गाला निधी देण्याव्यतिरिक्त एकही भरीव काम मंत्री पाटील यांच्या काळात झालेले नाही. राज्यातील शिवाजी विद्यापीठ वगळता सर्व अकृषी विद्यापीठांमधील भरतीला मान्यता मिळाली. काही विद्यापीठांमधील भरती प्रक्रिया पूर्णही झाली. मंत्री पाटील यांची ताकद कमी पडत आहे का? अशीही शंका उपस्थित होत आहे.

या विद्यापीठातील भरतीला मिळाली मान्यतासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ-अमरावती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- छत्रपती संभाजीनगर, गोंडवाना विद्यापीठ-गडचिरोली, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ-जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ-नागपूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ-नांदेड.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठchandrakant patilचंद्रकांत पाटील