शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दूध खरेदी दरातील वाढ सरकारची घोडचूक, अरूण नरके यांनी व्यक्त केले परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:47 IST

अतिरिक्त दूध असताना व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडर, बटरचे दर कोसळलेले असताना दूध खरेदी दरातील प्रतिलिटर तीन रूपयांची वाढ ही सरकारची घोडचूक आहे. असे परखड मत इंडियन डेअरी असोसिशनचे अध्यक्ष अरूण नरके यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित ‘कात्रज डेअरी एक्स्पो’माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दूध उत्पादक संघाचा कार्यक्रम

कोल्हापूर : अतिरिक्त दूध असताना व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावडर, बटरचे दर कोसळलेले असताना दूध खरेदी दरातील प्रतिलिटर तीन रूपयांची वाढ ही सरकारची घोडचूक आहे. असे परखड मत इंडियन डेअरी असोसिशनचे अध्यक्ष अरूण नरके यांनी व्यक्त केले.पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कात्रज डेअरी एक्स्पो’च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

नरके म्हणाले, गाय दूध खरेदी दरात तीन रूपये वाढ केल्याने कमीत कमी प्रतिलिटर २७ रूपये दर द्यावा लागतो. संघाची परिस्थिती नसतानाही सरकारचा आदेश म्हणून खासगी व सहकारी दूध संघांनी दरवाढ केली. त्यामुळे ‘गोकुळ’ दूध संघाला २५ कोटीचा तोटा सहन करावा लागला. तो सहन करण्याची ताकद ‘गोकुळ’कडे असल्याने फार ते पेलले. पण इतर खासगी व सहकारी संघांची गोची झाली आहे.

दूध उत्पादकांना आधूनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी ‘एक्स्पो’ चे आयोजन गरजेचे आहे. मात्र यासाठी येणाऱ्या खर्चाचा निम्मा भार सरकार तर २५ टक्के भार दूध महासंघाने उचलला पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.

पुणे विभागाचे प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी महेश मुळे म्हणाले, दूधाचा उत्पादन खर्च प्रतिलिटर ३५ ते ४० रूपये असताना चोवीस रूपये भाव दिला जातो. त्यात या सरकारने तीन रूपये वाढ करून उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.

हा निर्णय दूध संघांना मारक ठरत असेल तर या क्षेत्रातील अभ्यासकांनी आपली भूमिका सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माजी खासदार अशोक मोहोळ, ‘महानंदा’चे माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, वर्षा शिवले, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूरPuneपुणे