संशोधनामुळेच आजच्या युगात प्रगती : विनय सहस्त्रबुध्दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:53+5:302021-01-23T04:24:53+5:30
कुरुंदवाड : ज्ञानाच्या नव्या युगात आपल्याला अभ्यास, संशोधन, अध्ययन याचा आधार घेतल्याशिवाय प्रगती करता येणार नाही. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अटल ...

संशोधनामुळेच आजच्या युगात प्रगती : विनय सहस्त्रबुध्दे
कुरुंदवाड : ज्ञानाच्या नव्या युगात आपल्याला अभ्यास, संशोधन, अध्ययन याचा आधार घेतल्याशिवाय प्रगती करता येणार नाही. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अटल टिंकरिंग लॅब उद्याच्या पिढ्या घडवून नेण्यासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलमधील अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सहस्त्रबुद्धे बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड. मुकुंदराव अर्जुनवाडकर होते. उद्योजक बन्सी ओस्तवाल यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी खासदार सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते विद्यालयातील टिंकरींग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. अॅड. अर्जुनवाडकर म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. समाजातील गोरगरीब व उपेक्षित मुलांना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य संस्था करत आहे. यावेळी डॉ. सी. डी. काणे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत संस्थेचे सचिव प्रा. एम. डी. पुजारी यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा. शरद पराडकर यांनी केले. कार्यक्रमाला अंजली कुलकर्णी, अनिल भुजुगडे, देवराज मगदूम, श्रीकांत पटवर्धन, विजय जमदग्नी, तातोबा शहापुरे, राहुल पागे, श्रद्धा कुलकर्णी, सुरेश शेट्टी, पांडुरंग माने, प्रदीप पाटील, नगरसेवक उदय डांगे, प्रसाद कुलकर्णी, सुभाष कोळेकर, विजय कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले तर डॉ. डी. पी. कुलकर्णी यांनी आभार मानले.
फोटो - २२०१२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील एस. पी. हायस्कूलमधील अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले.