विश्वास सहकारी पतसंस्थेला २२ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:35+5:302021-05-07T04:24:35+5:30

करंजफेण : कोतोली (ता. पन्हाळा) येथील विश्वास सह. पतसंस्थेस २०२०/२१ या आर्थिक वर्षात एकूण २२ लाख २५ हजार ...

Profit of 22 lakhs to Vishwas Sahakari Patsanstha | विश्वास सहकारी पतसंस्थेला २२ लाखांचा नफा

विश्वास सहकारी पतसंस्थेला २२ लाखांचा नफा

करंजफेण : कोतोली (ता. पन्हाळा) येथील विश्वास सह. पतसंस्थेस २०२०/२१ या आर्थिक वर्षात

एकूण २२ लाख २५ हजार नफा झाला असून, उलाढाल ४० कोटी ३७ लाख इतकी झाली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी सांगितले.

सभासदांना सहा टक्के लाभांश वाटप केला असून, संस्थेत ८ कोटी ६६ लाख इतक्या ठेवी आहेत. संस्थेने ५ कोटी ७२ लाख कर्ज वाटप केले आहे. बँक शिल्लक व गुंतवणूक ४ कोटी ४६ लाख इतकी आहे. भागभांडवल व निधी १ कोटी ३३ लाख इतका आहे. एकूण खेळते भांडवल १० कोटी ४२ लाख आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष यशवंत पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Profit of 22 lakhs to Vishwas Sahakari Patsanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.