'लोकप्रेम बँक बॅलन्स अन् लोक चळवळ श्वास', प्राध्यापक एन. डी. पाटील काळाच्या पडद्याआड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 15:10 IST2022-01-17T14:33:34+5:302022-01-17T15:10:01+5:30
प्रश्न कोणताही असो, त्यात एकदा पाऊल ठेवले की माघार नाही, असाच त्यांच्या संघर्षाचा स्थायीभाव राहिला.

'लोकप्रेम बँक बॅलन्स अन् लोक चळवळ श्वास', प्राध्यापक एन. डी. पाटील काळाच्या पडद्याआड!
कोल्हापूर : सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या नारायण ज्ञानदेव पाटील ऊर्फ एन. डी. पाटील हे १८ वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. कोल्हापूर शहर विधानसभा मतदार संघातून ते १९८५ साली विधानसभेत निवडून गेले. ‘पुलोद’च्या काळात (१९७८ ते ८०) मुख्यमंत्री शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सहकारमंत्री म्हणून काम केले.
प्रा. पाटील हे २३ वर्षे आमदार व काही वर्षे मंत्रीही होते; परंतु त्या पदाचा वापर करून त्यांनी कोणतीही संपत्ती गोळा केली नाही की बँक बॅलन्स वाढविला नाही. लोकप्रेम हाच त्यांचा खरा बँक बॅलन्स व लोकचळवळ हाच त्यांचा श्वास राहिला. ‘रयत’मध्ये अठरा वर्षे अध्यक्ष असताना खर्चाचे एकही व्हौचर त्यांच्या नावे फाटलेेले नाही.
प्रश्न कोणताही असो, त्यात एकदा पाऊल ठेवले की माघार नाही, असाच त्यांच्या संघर्षाचा स्थायीभाव राहिला. कोल्हापूरचा टोल लढ्यातही प्रा. पाटील यांचे नेतृत्व होते म्हणूनच तो यशस्वी झाला. सीमाप्रश्न तर त्यांचे नेतृत्व होते.
आयुष्यभर शे.का. पक्षाच्या लाल झेंड्याशी बांधीलकी, अभ्यासू वृत्ती, तत्त्वज्ञानाशी, विचारसरणीशी अतूट बांधीलकी, शेतकरी, कामगार व शोषित जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेला असा हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला.