शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टसह मिरवणुकींची परवानगी आता मिळणार झटपट

By admin | Updated: July 30, 2015 00:54 IST

सेवा हमी कायदा : पोलीस प्रशासनाकडूनही होणार अंमलबजावणी

एकनाथ पाटील - कोल्हापूर -कोणताही दाखला किंवा परवाना मिळवायचा असेल तर नागरिकांना सहा-सहा महिने पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश पोलिसांवरही बंधनकारक केल्याने नागरिकांना पोलीस ठाण्यात सर्व सेवा झटपट मिळणार आहेत. पासपोर्टपासून चारित्र्य पडताळणी दाखला, सभा, मिरवणुकीची परवानगी, हॉटेल-बार, शस्त्र परवाना, आदींचे दाखले एक महिन्याच्या आत नागरिकांच्या हातामध्ये देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले आहेत. शिक्षण, नोकरी किंवा इतर कारणांसाठी महत्त्वाच्या दाखल्यांसाठी पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांना जावे लागत असते. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे दाखला किंवा प्रमाणपत्र कोणतेही असो, त्याला किमान सहा महिने प्रतीक्षा करावी लागत असे. वशिला आणि पैसा असेल तर सहा महिन्यांचे काम दोन दिवसांत करणारी यंत्रणा पोलीस प्रशासनात गोपनीय पद्धतीने आजही सुरू आहे, परंतु सामान्य लोक या यंत्रणेमुळे भरडले जातात. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाने नागरिकांना आता पोलीस ठाण्यात सर्व सेवा झटपट देण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक कार्यालयात नागरिकांना किती दिवसांत प्रमाणपत्र द्यावे, याचा माहितीफलक लावण्यात आला आहे.महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशानुसार पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कामास प्राधान्य देऊन कागदपत्रांची पडताळणी करून मुदतीत त्यांना दाखले किंवा प्रमाणपत्रे देण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिले आहेत. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षकपासपोर्टचे काम आॅनलाईनपासपोर्ट (व्हिसा) काढण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना नागरिक मेटाकुटीला येत असतात. पासपोर्ट विभागाकडे अर्ज केल्यानंतर तो संबंधित पोलीस ठाण्याकडे पडताळणीसाठी येत असतो. त्यानंतर पुन्हा तो पासपोर्ट विभागाकडे पाठविला जातो. तेथून तो पोलीस अधीक्षकांची सही होऊन पुणे विभागाकडे पाठविला जात असे. त्यामुळे वर्षभरानंतर नागरिकाच्या हाती पासपोर्ट मिळत असे, परंतु आता ही कोल्हापूर ते पुणे अशी पासपोर्टची पडताळणी आॅनलाईन सुरू केली आहे. आता स्थानिक पातळीवरही पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभाग व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे पासपोर्टचे कामकाज आॅनलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा प्रयत्नशील आहेत.