तुळशीतील पाणी उपशाचा प्रश्न मार्गी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:21+5:302021-06-28T04:17:21+5:30
दरम्यान आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पद येताच त्यांनी या प्रश्नाकडे तत्काळ ...

तुळशीतील पाणी उपशाचा प्रश्न मार्गी !
दरम्यान आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पद येताच त्यांनी या प्रश्नाकडे तत्काळ लक्ष देऊन गेल्या सात वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावला .
धामोड येथील तुळशी जलाशयांमध्ये देऊळवाडी, कुदळवाडी, बुरंबाळी, आपटाळ , केळोशी खुर्द इत्यादी गावातील लोकांची शेती गेल्याने हे लोक धरणग्रस्त बनले . पैकी बहुतांशी लोकांना जलाशयातून पाणी उपसा परवाना मिळण्यासाठीचा अर्ज करून देखील पाणी परवाना मिळत नव्हता . तांत्रिक कारण पुढे करून प्रशासनाने प्रस्ताव नाकारले होते . दरम्यान लोकांनी मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारून देखील त्यांना न्याय मिळाला नाही. हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी तुळशी धरण स्थळावरच धरणग्रस्त बांधवांची व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली काढत ज्यांना पाणी परवाना हवा आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना केल्या . या बैठकीस कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर ,शाखा अभियंता विजयराव आंबोळे, सागर धुंदर, धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष कृष्णात इंगवले, एकनाथ चौगले, आपटाळचे पोलीस पाटील बाळासो पाटील, सुभाष गुरव, ब्रह्मदेव पाटील, जावेद मोमीन ,स्वप्नील कांबळे , बाबूराव मालप , दीपक खामकर आदींसह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - तुळशी धरण स्थळावर पाणी परवान्याबाबत धरणग्रस्त बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश आबिटकर, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, शाखा अभियंता विजयराव आंबोळे आदी.