शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह मोबाईल, गांजा प्रकरण : सीसीटीव्हीचे फुटेज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 10:48 IST

Jail Crimenews- कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मोबाईल व गांजा प्रकरणाच्या तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. दरम्यान, मोबाईल व गांजाची पाकिटे कारागृहात फेकलेल्या संशयितांचे चारचाकी वाहन हे मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास किणी टोल नाक्यावरुन पुढे पुण्याच्या दिशेने गेल्याचे नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देसंशयिताचे वाहन किणी टोल नाक्यावरुन पास कारागृह मोबाईल, गांजा प्रकरण : सीसीटीव्हीचे फुटेज जप्त

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मोबाईल व गांजा प्रकरणाच्या तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. दरम्यान, मोबाईल व गांजाची पाकिटे कारागृहात फेकलेल्या संशयितांचे चारचाकी वाहन हे मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास किणी टोल नाक्यावरुन पुढे पुण्याच्या दिशेने गेल्याचे नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कळंबा कारागृहात गंभीर गुन्ह्यातील कैदी असताना तेथे मोबाईल, पेनड्राईव्ह, चार्जर आदी साहित्य कैद्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रकरणाची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची युध्दपातळीवर चौकशी करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, कारागृहात गांजा व मोबाईल फेकणाऱ्या संशयितांच्या वाहनाच्या मागावर पोलीस आहेत.

जुना राजवाडा पोलिसांनी किणी व कोगनोळी टोल नाक्यावरील मंगळवारी पहाटेपासूनचे वाहनांचे २७ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयितांचे चारचाकी वाहन हे किणी टोल नाक्यावरुन मंगळवारी पहाटे तीन वाजता पुण्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. हे फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे.दुसऱ्या घटनेतील मोबाईलबाबतही कसून चौकशीमोबाईल व गांजा प्रकरण ताजे असतानाच कारागृह अधीक्षकपदाचा पदभार घेतल्यानंतर काही वेळातच चंद्रमणी इंदूरकर यांनाही बराक झडतीत अतिसुरक्षा विभागाजवळ पिशवीत आणखी एक मोबाईल व चार्जर सापडला. त्याही मोबाईलचा वापर कधीपासून सुरु आहे, त्याचे सीमकार्ड कोठे आहे, याचा शोध सुरु आहे. या मोबाईलच्या दोन्हीही घटनांची चौकशी जुना राजवाडा पोलीस करत आहेत. या प्रकरणात कारागृहातील रक्षकांचा किती सहभाग आहे, याचीही कसून चौकशी पोलीस करत आहेत.पुण्यातील टोळीचा संशययापूर्वी कारागृहात चेंडू टाकून गांजा पुरवणाऱ्या पुण्यातील टोळीचा पोलिसांनी छडा लावला होता. आता मोबाईल कारागृहात फेकून गेलेले संशयितांचे वाहन किणी टोल नाक्यावरुन पुढे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यामुळे या घटनेतही पुण्यातील टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्यादृष्टीने तपास सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंगkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस