कळंबा येथे जुगारअड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:22 IST2020-12-08T04:22:27+5:302020-12-08T04:22:27+5:30

कारवाई केलेल्या संशयितांची नावे अशी : नीलेश बाबूराव गवळी (वय ४२, रा. शिंगणापूर), विश्वास सदाशिव जगताप (४५, कळंबा), रोहन ...

Print on gambling den at Kalamba | कळंबा येथे जुगारअड्ड्यावर छापा

कळंबा येथे जुगारअड्ड्यावर छापा

कारवाई केलेल्या संशयितांची नावे अशी : नीलेश बाबूराव गवळी (वय ४२, रा. शिंगणापूर), विश्वास सदाशिव जगताप (४५, कळंबा), रोहन अशोक भोसले (३१, सुतारमळा, लक्षतीर्थ वसाहत), वैभव विक्रम कुलकर्णी (२६, राजोपाध्येनगर), रणजित महादेव पाटील (३६, कौलव पैकी बरगेवाडी, ता. राधानगरी), विलास तुकाराम कळंबकर (४९, निढोरी, ता. कागल), हरी परशू साठे (७५, वळिवडे), मारुती शामराव चव्हाण (५५, चिखली), गजानन उन्ने (संपूर्ण नाव माहीत नाही).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कळंबा येथील पाॅवर ग्रीड मार्गावरील उन्ने फार्महाऊसच्या खुल्या जागेत तीन पानी पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २८ हजार ६५० रोख रक्कमेसह मोबाईल संच, दुचाकी जप्त केली. आठ जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(तानाजी)

Web Title: Print on gambling den at Kalamba