शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच 'आजारी'

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

नऊ पदे रिक्त : २२ गावांतील रुग्णांची गैरसोय

चंद्रकांत पाटील - गगनबावडा -तालुक्यातील निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळे आजारी पडण्याच्या स्थितीत आहे. हा तालुका दुर्गम व डोंगराळ असून, येथे कोणतीही अत्याधुनिक सोयी-सुविधा असणारा एकही मोेठा दवाखाना उपलब्ध नाही. त्यामुळे येथील परिसरातील सुमारे २२ गावांतील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र निवडेचा आधार घ्यावा लागतो. अधिकारी, कर्मचारी यांची एकूण मंजूर पदे २२ असताना यातील केवळ १३ पदे भरलेली आहेत. नऊ पदे रिक्त असल्याने तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होत असून ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण आरोग्य केंद्रात निवडे केंद्राचा पहिल्या दहामध्ये क्रमांक लागतो. मात्र, अधिकारी, कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्राचेच आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. उपकेंद्र किरवे येथील आरोग्यसेविकेची सेवानिवृत्ती जवळ आल्याने त्या सतत रजेवर जात आहेत व तेथील कंत्राटी आरोग्यसेविका गेली तीन महिने प्रसूती रजेवर आहेत. या उपकेंद्राचा कारभार उपकेंद्र मणदूर येथील आरोग्यसेविकेकडे दिला आहे. त्यासुद्धा दीर्घ मुदतीच्या प्रसूती रजेवर गेल्या आहेत. एकूणच कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज चालू असून, रुग्णांची मात्र गैरसोय होत आहे. स्त्री कर्मचाऱ्यांना डे-नाईट ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांची पुरती दमछाक होत आहे. अतिरिक्त कामकाजांमुळे कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यातच येथील लिपिक पद गेले चार महिने रिक्त असल्याने कर्मचारीवर्गाचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहेत. गेले सहा महिने आरोग्य केंद्र निवडे येथील रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. पावसाळ्यामुळे साथीचे आजार डोके वर काढतात. अशावेळी वेळेवर उपचार झाले नाहीत, तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. पावसाळ््यात या आरोग्य केंद्राची मोठी मदत होत असते. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याकडे विशेष लक्ष देऊन रिक्त पदांची भरती तत्काळ करावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.