शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘मी सांगतो त्याप्रमाणे करा, तुमचे चांगले होईल’; भामट्या ज्योतिषाकडून पुजारी महिलेला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:45 IST

गडहिंग्लज : ‘मी ज्योतिषी आहे, सांगतो त्याप्रमाणे करा, तुमचे चांगले होईल’, अशी बतावणी करून येथील मारुती मंदिराच्या महिला पुजारीच्या ...

गडहिंग्लज : ‘मी ज्योतिषी आहे, सांगतो त्याप्रमाणे करा, तुमचे चांगले होईल’, अशी बतावणी करून येथील मारुती मंदिराच्या महिला पुजारीच्या ६५ हजाराच्या दागिन्यावर भामट्या ज्योतिषाने डल्ला मारला. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (दि.८) शहरातील गजबजलेल्या नेहरू चौकातील मारुती मंदिरात ही घटना घडली.पोलिसातून मिळालेली माहिती अशी, येथील नेहरू चौकातील मारुती मंदिरातील पूजा-अर्चा चंद्रकांत गुरव यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी विजया या रविवारी सकाळी मंदिरात पूजा करीत होत्या. दरम्यान, मंदिरात आलेल्या ज्योतिषाने आपल्याजवळील काही रक्कम मंदिरातील टेबलावर दक्षिणा म्हणून ठेवली. ‘आपण ज्योतिषी आहोत, तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी काढून ठेवा, तुमचे चांगले होईल’, असे त्याने विजया यांना सांगितले.चेन व अंगठी त्याने पैशात गुंडाळून आपल्याकडील प्लास्टिकच्या कॅरीबॅगेमध्ये घालून विजया यांच्या हातात दिली व तो ज्योतिषी मंदिरातून निघून गेला. त्यानंतर विजया यांनी कॅरीबॅगेत पाहिले असता त्यात चेन व अंगठी नसल्याचे आढळून आले. विजया गुरव यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

‘देवा’समोरच गेले दागिनेनेहरू चौकातील मारुती मंदिराची नित्य पूजा चंद्रकांत गुरव यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन आणि ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी भामट्या ज्योतिषाने हातचलाखीने मंदिरातील पूजेच्यावेळीच लांबवली. भर वस्तीतील मंदिरात देवासमोरच झालेल्या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस