शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांना 'एसइआयए पुरस्कार' प्रदान; दिल्लीतील कार्यक्रमात वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:36 IST

के. पी. यांच्या साधेपणाने वेधले सर्वांचे लक्ष

सरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी पाटील यांना देशाच्या साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या चिनीमंडी या संस्थेकडून प्रतिष्ठेचा शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल अॅवॉर्डस् (एसइआयए) हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील ग्रँड हयात येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.माजी आमदार के. पी. पाटील  हे बिद्री सहकारी साखर कारखान्यात तब्बल ४० वर्षे संचालक तसेच १९ वर्षे अध्यक्षपदी आहेत. या काळात त्यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी उच्चांकी उसदर दिला आहे. याशिवाय कारखान्याचे गाळप विस्तारीकरण आणि सहवीज प्रकल्प यशस्वीपणे पार पाडले आहे. इथेनॉल प्रकल्पही अंतिम टप्प्यात असून लवकरच यातून प्रत्यक्ष उत्पादन सुरु होणार आहे. त्यांच्या दुरदृष्टीमुळे कारखान्याला आजवर राज्य आणि देशपातळीवरील विविध पुरस्कारांनी अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे.उस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला सर्वाधिक उसदर आणि साखर कारखानदारीतील योगदानाची दखल घेत अध्यक्ष के. पी. पाटील यांची साखर उद्योगातील प्रथितयश संस्था असलेल्या चिनीमंडी या संस्थेने २०२४ च्या  पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. पुरस्कार वितरणावेळी संस्थेचे संस्थापक व सीईओ यु. पी. शहा यांच्यासह देशभरातील साखर उद्योगातील तज्ञ मान्यवर उपस्थित होते.  

के. पी. यांच्या साधेपणाने वेधले सर्वांचे लक्षनवी दिल्लीतील ग्रँड हयात येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी देशभरातून आलेल्या साखर उद्योगातील अनेक मान्यवरांची मांदियाळी होती. पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला ही सर्व मंडळी सुटा-बुटात आलेली असताना पांढरा शर्ट, पांढरी विजार आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी परिधान केलेल्या के. पी. पाटील यांच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK P. Patilके. पी. पाटीलSugar factoryसाखर कारखानेdelhiदिल्ली