चिमासाहेब उद्यानातील ऐतिहासिक कारंजाचे अस्तित्व राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:44+5:302021-02-05T07:09:44+5:30

कोल्हापूर : सीपीआर येथील चिमासाहेब उद्यानाची दुरवस्था झाली असून महापालिकेने तातडीने याकडे लक्ष द्यावे. येथील ऐतिहासिक कारंजातील पाणी कित्येक ...

Preserve the historic fountain in Chimasaheb Park | चिमासाहेब उद्यानातील ऐतिहासिक कारंजाचे अस्तित्व राखा

चिमासाहेब उद्यानातील ऐतिहासिक कारंजाचे अस्तित्व राखा

कोल्हापूर : सीपीआर येथील चिमासाहेब उद्यानाची दुरवस्था झाली असून महापालिकेने तातडीने याकडे लक्ष द्यावे. येथील ऐतिहासिक कारंजातील पाणी कित्येक दिवसांपासून बदललेले नसल्याने कारंजाला धोका निर्माण झाला आहे. कारंजाचे अस्तित्व राखावे, अशा मागणीचे निवेदन क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज सांस्कृतिक मंडळाच्यावतीने महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.

तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून चिमासाहेब उद्यानाचे सुशोभिकरण केले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून देखभाल केली नसल्यामुळे उद्यानाची दुरवस्था झाली आहे. येथील पाणी उपसा करून पुन्हा कारंजा सुरू करावा, परिसरातील ड्रेनेजच्या पाण्याचा बंदोबस्त करावा, संरक्षक कठड्याचे ग्रील बसवावे, सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष वैभवराज राजेभोसले, राहुल फल्ले, रवींद्र गुरव, महादेवराव पाटील आदींनी केली.

फोटो : २५०१२०२० कोल केएमसी चिमासाहेब उद्यान

ओळी :

कोल्हापुरातील चिमासाहेब उद्यानातील दुरवस्थांबाबत क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज सांस्कृतिक मंडळाच्यावतीने महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले.

Web Title: Preserve the historic fountain in Chimasaheb Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.