नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांना स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:48+5:302021-01-13T04:59:48+5:30
पेठवडगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० या स्पर्धेमध्ये पेठवडगाव शहराला देशात १२ वा, तर पश्चिम विभागामध्ये ५ ...

नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांना स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार प्रदान
पेठवडगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० या स्पर्धेमध्ये पेठवडगाव शहराला देशात १२ वा, तर पश्चिम विभागामध्ये ५ वा क्रमांक मिळाल्याबद्दल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नगराध्यक्ष मोहनलाल माळी, मुख्याधिकारी सुषमा शिंदे-कोल्हे यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कोल्हापूर येथे आयोजित नगर परिषद व नगरपंचायती आढावा बैठकीत हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, नगरविकास विभागाचे सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासन अधिकारी दीपक पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगराध्यक्ष माळी यांनी विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर केले.
सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक विकसित करण्यास १२ कोटी, प्रशासकीय इमारत बांधकामाला १० कोटी, व्यापारी संकुल बांधकाम ७ कोटी, विशेष रस्ता अनुदानासाठी ५ कोटी, तर २०१८-१९ मधील प्रलंबित विशेष रस्ता अनुदानाकरिता १ कोटी, स्वच्छ भारत अभियानामधील बक्षीस रकमेमधून हाती घेतलेल्या कामांच्या प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी स्तरावर मिळणे, शहर विकास कामांच्या बांधकाम विभागाकडील तांत्रिक मंजुरीसाठी भराव्या लागणाऱ्या फीमध्ये सवलत मिळावी आदी मागण्यांचा प्रस्ताव मंजूर करावा. याप्रश्नी वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.
------------
फोटो ओळ : ०९ वडगाव माळी पुरस्कार
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू सभागृहात जिल्ह्यातील आढावा बैठकीत वडगाव पालिकेला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला. नगराध्यक्ष मोहनलाल माळी, मुख्याधिकारी सुषमा शिंदे -कोल्हेेे यांनी तो स्वीकारला.