मतदान केंद्रांचा आराखडा तयार करा: करवीर प्रांताधिकाऱ्यांच्या सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:03 IST2019-03-18T16:01:21+5:302019-03-18T16:03:13+5:30
मतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा गेऊन आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांग मतदारांसाठी रॅँप बनवून घ्या, मतदान केंद्राबाहेर मतदारांना सावलीसाठी मंडप उभारावा, पाण्याचे नियोजन करा, अशा सुचना करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोमवारी केल्या. तसेच प्रत्येकाने आपापल्या मतदान केंद्रांचा आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोल्हापूरातील करवीर प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’चे प्रशिक्षण देण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : मतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा गेऊन आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांग मतदारांसाठी रॅँप बनवून घ्या, मतदान केंद्राबाहेर मतदारांना सावलीसाठी मंडप उभारावा, पाण्याचे नियोजन करा, अशा सुचना करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोमवारी केल्या. तसेच प्रत्येकाने आपापल्या मतदान केंद्रांचा आराखडा तयार करुन सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील करवीर प्रांताधिकारी कार्यालयात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील क्षेत्रीय अधिकाºयांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होेते. प्रमुख उपस्थिती करवीर तहसिलदार सचिन गिरी होते. तसेच मतदारसंघातील ४१ क्षेत्रीय अधिकारीही उपस्थित होते.
प्रांताधिकारी इथापे यांनी मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील सोयी सुविधांचा आढावा घेतला. कोणत्या मतदान केंद्रांवर रॅँप बनविण्याची गरज आहे, कोणत्या केंद्रावर पाण्याची सोय नाही, कोणत्या केंद्रावर उन्हापासून बचावासाठी सावलीकरीता मंडपाची आवश्यकता आहे याची माहिती घेतली. यानंतर आवश्यक त्या ठिकाणी दिव्यांग मतदारांकरीता रॅँप बनवून घ्या, पाण्याची योग्य सुविधा करा, तसेच मतदारांना उन्हाच्या झळा बसू नयेत यासाठी मंडप उभारा अशा सुचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या.
त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राचा आराखडा तयार करुन तो सादर करावा. यामध्ये मतदान केंद्रातील खोलीचा नकाशा, मतदान केंद्राअंतर्गत येणारे पुरुष व स्त्री मतदारांचे प्रमाण, मतदान केंद्राचा पुर्र्वाेइतिहास अशी माहिती असावी अशा सुचना प्रांताधिकाऱ्यां नी दिल्या. दरम्यान उपस्थित क्षेत्रिय अधिकाऱ्यां ना ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ मशिन एकत्रित जोडायचे कसे याचे प्रशिक्षण देण्यात आले.