शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पूर्वतयारी करा, निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:49 IST

राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित घ्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने रविवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. एकीकडे हे पूर्वतयारीचे आदेश असताना दुसरीकडे राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित घ्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, यावर आज, सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत पावसाळ्यानंतर चर्चा सुरू होत्या. यानंतर प्रभाग रचना आणि आरक्षणही जाहीर झाले. परंतु काही जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. एकीकडे ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना हे शक्य नसल्याचे वास्तव आहे. अशातच ज्या जिल्हा परिषदांनी ५० टक्क्यांच्या आत आरक्षण ठेवले आहे, अशा १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तयारी केली आहे.याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाने रविवारी सुटीच्या दिवशीही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढून निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या सूचना दिल्या आहेत. बंदोबस्तापासून ते अधिकारी, कर्मचारी नियुक्तीपर्यंत सविस्तर असा हा आदेश असून, निवडणूक आयोगाने ही तयारी केल्याचे दिसून येते. मात्र, सोमवारी दिल्लीत होणाऱ्या सुनावणीवरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे वेळापत्रक अवलंबून आहे.